• Home
  • 🛑 खुशखबर….! ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलसाठी पुण्याच्या….! सिरम इन्स्टिट्यूटला मिळाली परवानगी 🛑

🛑 खुशखबर….! ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलसाठी पुण्याच्या….! सिरम इन्स्टिट्यूटला मिळाली परवानगी 🛑

🛑 खुशखबर….! ऑक्सफर्ड लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रायलसाठी पुण्याच्या….! सिरम इन्स्टिट्यूटला मिळाली परवानगी 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंता वाढत चालली आहे. मात्र, जगभरात यावर लस शोधण्याचे काम सुरू आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठ तयार करत असलेल्या लसीची दुसरी आणि तिसरी मानवी चाचणी आता पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे. त्याची परवानगी डीसीजीआय यांनी सिरम इन्स्टिट्यूट यांना दिली आहे.

याची चाचणी लवकरच पुण्यात सुरू होणार आहे. यासाठी वोलेनटियर नेमले आहेत.

त्यांना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस २९ दिवसांनी देण्यात येणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची पहिली चाचणी झाल्यानंतर २ आणि ३ री चाचणी करण्याची परवानगी याआधी मागण्यात आली होती.

मात्र, काल रात्री उशिरा ही परवानगी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूट यांना देण्यात आली आहे.

या क्लिनिकल ट्रायलमध्ये १८ वर्षांवरील १६०० लोकांना ही लस देण्यात येणार आहे. यात १७ ठिकाणी ही चाचणी करण्यात येणार आहे.

सध्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या या लसीची दुसरी आणि तिसरी क्लिनिकल ट्रायल युकेमध्ये सुरू आहे.

तिसरी क्लिनिकल ट्रायल ब्राझिल आणि पहिली आणि दुसरी क्लिनिकल ट्रायल साऊथ आफ्रिकामध्ये सुरू आहे….⭕

anews Banner

Leave A Comment