• Home
  • पेट्रोल-डिझेल,गँस दरवाढीच्या निषेधार्थ व केंद्र सरकारच्या विरोधात कळवण तालुक्यातील शिवसेनेचे निषेध आंदोलन…

पेट्रोल-डिझेल,गँस दरवाढीच्या निषेधार्थ व केंद्र सरकारच्या विरोधात कळवण तालुक्यातील शिवसेनेचे निषेध आंदोलन…

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210205-WA0094.jpg

पेट्रोल-डिझेल,गँस दरवाढीच्या निषेधार्थ व केंद्र सरकारच्या विरोधात कळवण तालुक्यातील शिवसेनेचे निषेध आंदोलन…
शिवसेना पक्षप्रमुख *मा उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार…..महाराष्ट्रात पेट्रोल- डिझेल,गँस भाव दरवाढ विरोधात केंद्रातील सरकारला जाग येण्यासाठी शिवसेना वतीने संपुर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकार विरोधात तीव्र अदोलन…. आज शुक्रवार, दिनांक ५.२.२१ रोजी कळवण शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली कळवण बसस्थानक परीसरात केंद्र शासनाकडुन गेल्या वर्षभरात अनेकवेळा पेट्रोल,डिझेल गँस दरात वाढ करण्यात आली आहे.त्याचा परिणाम महागाईत वाढ झाली आहे.सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ सोसावी लागत आहेत आधीच कोरोना संकटामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला आहे व कुठेतरी त्यात शिथिलता व व्यवहार, रोजगार सुरळीत चालु होत असतानाच केंद्राने सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न व ज्याच्यावर महागाईत वाढ निश्चित समजली जाते अशा पेट्रोल,डिझेल व महिलांच्या घरातील अत्यावश्यक असणारा गँस यांच्या किमतीत वाढ करण्याचा सपाटा केंद्रशासनाने चालू ठेवला आहे त्याविरोधात आज कळवण शिवसेना पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक,वाहतूकदार,व्यापारी यांनी यावेळी कळवण बसस्थानक परिसरात उपस्थित रहाऊन या महागाई विरोधात निषेध व्यक्त केला
यावेळी दशरथ बच्छाव,अंबादास जाधव,साहेबराव पगार,संभाजी पवार,संजय रौदळ, विनोद भालेराव, आप्पा बूटे, विनोद मालपुरे, अजय पगार,किशोर पवार,मुन्ना हिरे,सुनिल पगार,अशोक जाधव,प्रकाश आहेर,वसंत देसाई,राजेंद्र चव्हाण, चिंतामण निकुंभ, पांडू शिवदे,राजेंद्र येवला,विलास इखंडकर,धर्मा आहिरे, लक्ष्मण भामरे,योगेश भामरे,राहुल सोनवणे,हिरालाल वाघ,सचिन पगार,प्रकाश भालेराव, ललित आहेर,अशोक हारदे,मोती निकम, माणिक शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते (बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क कळवण)

anews Banner

Leave A Comment