• Home
  • वीजग्राहकांना नोटीस न देता वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये ग्राहक पंचायत संघटनेची मागणी

वीजग्राहकांना नोटीस न देता वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये ग्राहक पंचायत संघटनेची मागणी

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210205-WA0118.jpg

वीजग्राहकांना नोटीस न देता वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये ग्राहक पंचायत संघटनेची मागणी
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड दिनांक 5 फेब्रुवारी 2021 रोजी मिळालेल्या माहितीनुसार मुखेड तालुक्यातील अनेक वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा लाईट बिल आलेली आहेत. याचा फायदा घेत महावितरण कंपनीने अनेकांचा वीजपुरवठा खंडित केला असून विना नोटीस वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये व जास्तीचे आलेले विज बिल कमी करून मिळावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र तथा तालुका शाखा मुखेड च्या वतीने करण्यात आली तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांच्यामार्फत मागणी करण्यात आल्याची माहिती ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोनाच्या covid-19 काळात ऊर्जा मंत्री श्री नितीन राऊत यांनी100 युनिट च्या आतील वीज बिले माफ करू असे आश्वासन देण्यात आले होते. त्यावेळी वीज ग्राहकांनी आपली वीज बिले भरली नव्हती महावितरण कंपनीने वीज देयकावर अव्वाच्या सव्वा व्याज दर आकारून गोरगरीब जनतेकडून विज बिले देण्यात आली असून अनाधिकृत वीज बिल वसुली मोहीम चालू केली आहे. वीज बिलाची छोटी रक्कम अथवा मोठी रक्कम तात्काळ भरणा करण्याचा तगादा वीज वितरण महामंडळातील अधिकाऱ्याकडून केला जात आहे. कोरोनाच्या काळात अनेकांची व्यवसाय बंद पडले तर अनेकांचे दिवाळे सुद्धा निघाले सरकारकडून कोणतीच मदत मिळाली नाही सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या वीज वितरण कंपनी मात्र जनतेस वाढीव वीज बिले देऊन ग्राहकांना नाहक मानसिक त्रास देत असून तात्काळ वीज पुरवठा खंडित करून व्यवसायाचे नुकसान करीत आहेत. वीजग्राहकांना आलेली जास्तीची वीज बिल देयके कमी करून देण्यात यावी. गोरगरिबांना वीज बिलाचे हप्ते पाडून देण्यात यावे. नोटीस न देता वीज पुरवठा खंडित करण्यात येणार नाही. अशी मागणी ग्राहक पंचायत शाखा महाराष्ट्र मुखेड च्या वतीने करण्यात आलेली आहे.वीज वितरण कायद्यानुसार पंधरा दिवसांची नोटीस दिल्याशिवाय वीजपुरवठा खंडित करण्यात येणार नाही नोटीस न देता वीज पुरवठा खंडित केला तर कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो असा ग्राहकास अधिकार आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर ग्राहक पंचायत चे सचिव अशोक बच्चेवार तालुका अध्यक्ष बालाजी वाडेकर महेताब शेख सचिव सुनील मुक्कावार कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर डोईजड उपाध्यक्ष रमेश पाटील इंगोले कोषाध्यक्ष खाजा धुंदी संघटक संजय कांबळे अर्जुन रॅपनवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

anews Banner

Leave A Comment