Home Breaking News राज्यातून देगलूर पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ट द्वितीय पुरस्कार….!

राज्यातून देगलूर पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ट द्वितीय पुरस्कार….!

151
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230712-WA0045.jpg

राज्यातून देगलूर पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ट द्वितीय पुरस्कार….!

मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धबडगे यांना द्वितीय पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान…

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्याचा विचार करून राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या निवड प्रकियेत महाराष्ट्र पोलीस ठाण्याचा समावेश व्हावा या दृष्टीने तसेच राज्यातील पोलीस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, गुणवत्ता वाढविणे, दिलेल्या मर्यादेत उत्कृष्ट पध्दतीने कामकरणे
गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास योग्य वेळेत करणे आदी हेतू
साध्य करण्यासाठी 2020 पासून राज्यपातळीवर ठरवून दिलेल्या निकषात जे पोलीस ठाणे बसतील असे पाच पोलीस ठाण्याचा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्याचा पुरस्कार देण्यात येतो. विशेष म्हणजे तेलंगणा व कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या देगलूर पोलीस ठाण्याला राज्यातून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने येथील पोलीस कर्मचाऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.

पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे हे 25 डिसेंबर 2019 ते ऑक्टोबर 2021 पर्यंत देगलूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांच्याच कार्य काळामध्ये देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हेगारावर मोठ्या प्रमाणात अंकुश बसला होता.तसेच कोरोना काळातही त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती हाताळली त्यांच्या या कामगिरीमुळे पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरीच्या गौरवात दिला जाणारा मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक 25 जानेवारी 2021 रोजी त्यांना देण्यात आले होते. 2015 साली पोलीस महासंचालक यांचे उत्कृष्ट सेवा पदक देऊनही त्यांना गौरविण्यात आले होते.त्याचबरोबर प्रत्येक नागरिकांशी पोलीस आपला मित्र आहे. हे नागरिकांना पटवून देण्यात ते यशस्वी झाले होते. पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे यांच्या कार्यशैलीमुळेच देगलूर पोलीस ठाण्याला राज्यातून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे हे नुकतेच सेवानिवृत्त झाले असले तरी देगलूर पोलीस ठाण्यात त्यांच्या कार्यशाळेची आजही चर्चा होत असते धबडगे यांचा मितभाषी गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी कठोर पावले उचलणे तसेच विनाकारण तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची वृत्ती असलेल्यांना तर ते फैलावरच घेऊन परत पाठवत असत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कधीच कुणावरही अन्याय होऊ दिला नाही, त्यामुळे धबडगे हे तालुक्यात हिरो ठरले दरम्यान सर्वोत्कृष्ट ठरलेल्या देगलूर पोलीस ठाण्याला सन्मानचिन्ह व रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

Previous articleएजंट-अभिकर्ता नियुक्तीसाठी 18 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
Next articleएक रुपयात पिक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांची पिळवणूक थांबणार,
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here