• Home
  • आमास सेवा ग्रुप मुंबई यांचा अनोखा उपक्रम

आमास सेवा ग्रुप मुंबई यांचा अनोखा उपक्रम

आमास सेवा ग्रुप मुंबई यांचा अनोखा उपक्रम (प्रतिनिधी -पांडुरंग गायकवाड सुरगाणा )
रोंघाणे -आमास सेवा ग्रुप मुंबई व लायनेस क्लब ऑफ जुहू रोड, पुष्य सेवा ग्रुप मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. शाळा रोंघाणे या शाळेला संगणक संच भेट देण्यात आला आहे. तसेच गावातील १२३कुटूंबाना दिवाळी भेट म्हणून मिठाई चिवडा, पेढे, चॉकलेट असे गोडधोड पदार्थ देण्यात आले. रोंघाणे गावातील अंगणवाडी चालिका,मदतनीस आशाताई यांना साडी वाटप करण्यात आली. तसेच जि. प.शाळेतील विद्यार्थ्यांना व गावातील मुलांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरवात आदिवासी वाद्यांनी,व नृत्यांनी केली. आदिवासी कला बघून आलेले पाहुणे अगदी खुश झाले. या कार्यक्रमाला उपस्थित पाहुण्यानी एव्हरेस्ट विरांगणी हेमलता गायकवाड व राज्यस्तरीय खो- खो चॅम्पियन वैशाली वार्डे या मुलींना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आलं. या कार्यक्रमात आदिवासी नृत्यात आलेल्या पाहुण्यांनी सहभाग घेतला. गावातील लहान -थोरांनी सहभाग घेऊन कार्यक्रम जोमात पार पडला. एकूणच दृश्य बघून आज दिवाळी साजरी होते असं वाटलं.
या कार्यक्रमाला लायनेस क्लब ऑफ जुहू रोड व पुष्य सेवा ग्रुप मुंबई च्या अध्यक्षा छायाबेन पारेख, आमास सेवा ग्रुप चे अध्यक्ष चंद्रकांतभाई देढिया, सदस्य नितीनभाई भानुशाली व भानुशाली परिवार,विक्रम भाई राजपुरोहित, हरिश्चन्द्र भोये, हे उपस्थित होते. तसेच सरपंच विलास घोटाळ, पोलीस पाटील दिलीप गायकवाड, केंद्रप्रमुख शारदा सरोदे मॅडम, smc अध्यक्ष व सदस्य, गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय देसले, भास्कर बागुल, धनंजय भोये, नलिनी भोये, नईम मणियार, केशव भोये, विष्णू धूम, काशिनाथ बागुल यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नईम मणियार यांनी केले व केशव भोये यांनी आभार व्यक्त केले.

anews Banner

Leave A Comment