Home Breaking News *भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जाणार हिमालयात*

*भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जाणार हिमालयात*

128
0

*भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जाणार हिमालयात*

*युवा मराठा न्यूज*

कोथरुडच्या आमदार मेधा कुलकर्णी यांचा पत्ता कट करत भाजपने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. चंद्रकांत पाटील या ठिकाणाहून विजयी देखील झाले. मात्र, त्यांच्यावर ते कोल्हापूर मधून पळून आले. अशी टीका सातत्याने केली जाते. यावर चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले…
जे मला म्हणतात ना कोल्हापूरमधून पळून आले. ते तिथे निवडून आले नसते. मात्र, मी आज मी एक चॅलेंज देतो की, कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन. असं म्हणत विरोधकांना आव्हान दिलं आहे.
यावेळी त्यांनी आपण कोल्हापूरमधून निवडणूक लढण्यास तयार होतो. असं सांगितलं मात्र, अमित शहा यांनीच आपल्याला कोथरुडमधून निवडणूक लढण्यास सांगितलं. त्यामुळं आपण कोथरुडमधून निवडणूक लढलो. असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी. अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे. मला कुठे यात अडकून ठेवता? मी जर मोकळा राहीलो तर महाराष्ट्रभर फिरेन असं त्यांना सांगितले.
आपण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचे जास्त जागा निवडून आणू, असे त्यांना सांगितले. मात्र, अमितभाईंनी आग्रह धरला तुला विधानसभा लढवायची असून आपको पुना मैं कोथरूडसे लढना है असंही सांगितलं. तसेच मी त्यानंतर माझ्या नावाची या मतदार संघातून घोषणा झाली आणि त्यानंतर आजवर माझ्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले.
मी कोल्हापुरातून पळून आलो. जातीचा विषय काढला. पण माझे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना आजही सांगणे आहे. मी कोल्हापूरमधील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास आजही तयार आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा. मी तेथून निवडणूक लढवेल. मला हरणे माहीत नाही. निवडून नाही आलो तर हिमालयात निघून जाईल, अशा शब्दांत त्यांनी हसन मुश्रीफ यांना आव्हान दिलं आहे.
ते पुण्यात कोथरूडचे आमदार म्हणून वर्षभरात केलेल्या कामाच्या वर्षपूर्ती कार्यालय अहवालाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

कोल्हापूर प्रतिनिधी .

Previous articleआमास सेवा ग्रुप मुंबई यांचा अनोखा उपक्रम
Next article*वयाच्या चौदाव्या वर्षी माझ्यावर* *लैंगिक अत्याचार झाले ,* *इरा खान*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here