Home नांदेड मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षण प्रश्नी सोमश्वरमध्ये साखळी उपोषण ;...

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षण प्रश्नी सोमश्वरमध्ये साखळी उपोषण ; आंदोलनाचा चौथा दिवस

32
0

आशाताई बच्छाव

IMG-20230927-WA0061.jpg

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ
मराठा आरक्षण प्रश्नी सोमश्वरमध्ये साखळी उपोषण ; आंदोलनाचा चौथा दिवस

नांदेड प्रतिनिधि

मराठा समाजच्या आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमेश्वर ता. नांदेड येथे सोमवार दि. २५ पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्या वतिने पत्रकार आनंदा बोकारे यांच्यासह महिला, नागरिकांचा आंदोलनामध्ये सहभाग आहे.

मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी जि. जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवसाच्या उपोषणा नंतर मागणी मान्य होई पर्यंत साखळी उपोषण सुरू केले आहे. राज्यातील मराठा समाज पूर्वीपासूनच मागास प्रवर्गात असल्याचे पुरावे देत जरांगे पाटील यांनी सरकारला चाळीस दिवसाचा कालावधी दिला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळास भेट देवून जरांगे पाटलांना एक महिण्याचा वेळ मागत लिंबू शरबत देवून उपोषण सोडले होते. पण आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जरांगे पाटील यांनी दहा दिवसाचा अतिरिक्त वेळ देत सरकारला एकून चाळीस दिवसाचा वेळ दिला आहे.

दरम्यान जरांगे पाटील यांच्या आंदोलनास राज्यभरातून पाठींबा वाढत आहे.

मराठा आरक्षण लढा व्यापक होत असून सरकारने वेळेच्य आत आरक्षणाची आंमलबजावणी करून सकल मराठा समाजाची मागणी मान्य करावी, राज्यात मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आदी मागण्यांसह मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोमेश्वर येथे सकल मराठा समाजाच्या वतिने आनंदा बोकारे पत्रकार यांनी सोमवार दि. २५ पासून सोमेश्वर मंदिरा समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. पत्रकार आनंद बोकारे यांच्यासह गिरीजाबाई बोकारे, शांतबाई बोकारे, गयाबाई बोकारे, प्रयागाबाई बोकारे, सिताबाई बोकारे, सुमित्राबाई बोकारे, जनाबाई बोकारे, मथुराबाई बोकोर, सुमनबाई बोकारे, चंद्रकलाबाई बोकारे, प्रभावतीबाई बोकारे, सागरबाई बोकारे, वैजंताबाई बोकारे, लक्ष्मीबाई बोकारे, रेखबाई बोकारे, किसनाबाई बोकारे, नंदाबाई बोकारे, गणेश बोकारे, डिगांबर बोकारे, ओंकार बोकारे, विलास बोकारे, विष्णू बोकारे, कैलास बोकारे, तुकाराम बोकारे, चांदू बोकारे, सोपान बोकारे, नामदेव बोकारे, गजानन बोकारे, पांडूरंग बोकारे यांच्या सह नागरिक सहभागी आहेत. बुधवारी दि. २७ तालुका प्रशासनाचे नायबतहसीलदार काशीनाथ डांगे, मंडळअधिकारी कुणाल जगताप, तलाठी विजय रनवीरकर, अनिल मुनेश्वर यांनी भेट देवून आंदोलनकांशी चर्चा केली.

Previous articleतेराव्या राष्ट्रीय हाफकिडो बॉक्सिंग कराटे स्पर्धेत तनुजा छोटू पाटील सूर्यवंशी हिचा प्रथम क्रमांक
Next articleरिक्षा व मोटारसायकल चोरटे चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here