Home जालना मुख्यमंत्री शिंदे यांची वांझोटी बैठक मराठा आरक्षणावर तातडीने सकारात्मक तोडगा काढावा ः...

मुख्यमंत्री शिंदे यांची वांझोटी बैठक मराठा आरक्षणावर तातडीने सकारात्मक तोडगा काढावा ः डॉ. संजय लाखे पाटील मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज ‘वडीकाळा’ ग्रामस्थासोबत

42
0

आशाताई बच्छाव

IMG-20230206-WA0055.jpg

मुख्यमंत्री शिंदे यांची वांझोटी बैठक
मराठा आरक्षणावर तातडीने सकारात्मक तोडगा काढावा ः डॉ. संजय लाखे पाटील
मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज ‘वडीकाळा’ ग्रामस्थासोबत
जालना (दिलीप बोंडे) ः मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या  विषयावर दि. 27 जानेवारी रोजी वडीकाळा ग्रामस्थ आणि मनोज जरंगे पाटील यांच्या दरम्यान चर्चा झाली. मात्र या चर्चे दरम्यान मराठा आरक्षणाबद्दल कुठलाही तोडगा निघाला नसला तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा बैठक घेऊन तोडगा काढू असे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवारी दि. 4 फेबु्रवार रोजी दुपारी 05 वाजता सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे अंबड तालुक्यातील वडीकाळा या गावातील आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि ईतर काही समन्वयकांसोबत मुख्यमंत्री शिंदे यांची वांझोटी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात काहीच ठोस निर्णय न झाल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला सरकारने तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी वडीकाळा येथील ग्रामस्थांनी लावून धरली असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही न्याय्य भूमिका ग्रामस्थांची असून ही मागणी सरकारने मंजूर करावी अशी मागणी सकल मराठा समाजाची ‘जनभावना’ ओळखून शिंदे फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोस भूमिका घेवून कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी भूमिका घ्यावी अशी अशी मागणी मराठा समाजबांधवांनी केली आहे.
या संदर्भात देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, शनिवारी दि. 4 फेबु्रवार रोजी दुपारी 05 वाजता सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे अंबड तालुक्यातील वडीकाळा या गावातील आंदोलकांचे शिष्टमंडळ आणि ईतर काही समन्वयकांसोबत मुख्यमंत्री शिंदे यांची वांझोटी बैठक पार पडली. या �

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here