• Home
  • 🛑 *खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे परिणाम दिसण्यास सुरूवात ….! पहिली धडक गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात* 🛑

🛑 *खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे परिणाम दिसण्यास सुरूवात ….! पहिली धडक गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात* 🛑

🛑 *खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे परिणाम दिसण्यास सुरूवात ….! पहिली धडक गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात* 🛑
✍️ जळगाव 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जळगाव :⭕वरीष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. 40 वर्षांची भाजची सोबत त्यांनी अखेर सोडली.राष्ट्रवादीत येताच आता खडसेंनी एक एक वार करणे सुरू केले आहे. त्यातच एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे परिणाम जळगाव जिल्ह्याच्या राजकारणावर दिसण्यास सुरुवात झाली आहे.

भाजप नेते गिरीश महाजन यांचां मतदारसंघ असलेल्या जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, भगवान पाटील यांच्या हस्ते फित कापून तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

जामनेर हा माजी मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ असून गेल्या 5 टर्म येथे भाजपची सत्ता आहे.

मात्र, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यालय सुरु करुन जोरदार सुरुवात केली आहे. जामनेर तालुक्यात गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रवादीचा बोर्ड लावू शकत नव्हतो मात्र आता लावला आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रफुल लोढा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर जळगावचे राजकारण बदलण्यास सुरुवात झाली आहे. मुक्ताईनगरमध्ये भाजपला आता कार्यालयासाठी जागा शोधावी लागणार आहे….⭕

anews Banner

Leave A Comment