Home नांदेड तेराव्या राष्ट्रीय हाफकिडो बॉक्सिंग कराटे स्पर्धेत तनुजा छोटू पाटील सूर्यवंशी हिचा प्रथम...

तेराव्या राष्ट्रीय हाफकिडो बॉक्सिंग कराटे स्पर्धेत तनुजा छोटू पाटील सूर्यवंशी हिचा प्रथम क्रमांक

129

आशाताई बच्छाव

IMG-20230927-WA0064.jpg

तेराव्या राष्ट्रीय हाफकिडो बॉक्सिंग कराटे स्पर्धेत तनुजा छोटू पाटील सूर्यवंशी हिचा प्रथम क्रमांक

नांदेड धर्माबाद

धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलची विद्यार्थिनी तनुजा छोटू पाटील सूर्यवंशी हिने नुकताच 24 सप्टेंबर 2023 रोजी पुणे येथे संपन्न झालेल्या तेराव्या राष्ट्रीय हाफकिडो बॉक्सिंग 2023 कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून दाखवून प्रथम क्रमांकाचे गोल्ड मेडल प्राप्त करून धर्माबाद चे नाव रोशन केले आहे.

आता मात्र तनुजा छोटू पाटील सूर्यवंशी हिने राष्ट्रीय कराटे स्पर्धेत मिळविलेल्या प्रथम क्रमांकाचे गोल्ड मेडल हा धर्माबादकरांसाठी अभिमानाची बाब आहे

हिच्या मिळालेल्या यशाबद्दल धर्माबाद तालुक्यातून व जिल्ह्यातून विविध पक्ष व सामाजिक संघटना तर्फे यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. यावेळी हेस वेल्फेयर फाउंडेशन (शासनमान्य सामाजिक संस्था) या संघटनेच्या वतीने सुद्धा तनुजा सूर्यवंशी हिचा जाहीर सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी हेस वेल्फेयर फाउंडेशन चे राष्ट्रीय प्रचारक सचिव बापूराव ढगे पाटील, धर्माबाद तालुका अध्यक्ष चंद्रभीम हौजेकर उपस्थित होते.