Home जळगाव रिक्षा व मोटारसायकल चोरटे चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात

रिक्षा व मोटारसायकल चोरटे चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात

121
0

आशाताई बच्छाव

IMG-20230928-WA0043.jpg

रिक्षा व मोटारसायकल चोरटे चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – चाळीसगाव शहर पोलीसांनी मोटार सायकल चोरी करणारे दोन आरोपींना तसेच रिक्षा चोरी करणऱ्या एक आरोपीस अटक केली आहे. विशेष म्हणजे रिक्षा चोरीतील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो वाहनधारकांना लिफ्टच्या बहाण्याने वाहने चोरी करीत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
दि.23 रोजी तन्वीर शेख रा. चाळीसगाव यांनी चाळीसगाव शहरात गणेश कॉम्पलेक्स परिसरात दुचाकी लावलेली असतांना अज्ञात दोन इसम ती दुचाकी चोरी करून घेऊन जात असतांना दिसल्याने शेख यांनी आजुबाजुच्या लोकांच्या मदतीने त्यांना अटकाव केला असता त्यातील एक इसम गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला तर एकाला ताब्यात घेतले. या घटनेची माहिती चाळीसगाव शहर पोलीसांना दिल्यानंतर पोना. दिपक पाटील,महेंद्र पाटील,अजय पाटील,अमोल भोसले, शरद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत ताब्यातील इसमास पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी तन्वीर शेख यांच्या तक्रारीवरुन चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव एकनाथ चव्हाण रा. लोंजे ता.चाळीसगाव असे असून त्याची सखोल चौकशी करता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यात त्याचा मित्र गणेश जयराम चव्हाण याने प्रोत्साहन तसेच मदत केल्याची माहिती दिली. या गुन्ह्यात गणेश चव्हाण याचा सहभाग निष्पन्न झाल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांनी त्यास तात्काळ शोध घेणेकामी मार्गदर्शन व सुचना देऊन आदेशीत केले होते. त्याप्रमाणे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक सुहास आव्हाड,हवालदार योगेश बेलदार, पोना.दिपक पाटील, महेंद्र पाटील, पोकॉ.अमोल भोसले, शरद पाटील, गणेश कुवर, निलेश पाटील, मोहन सुर्यवंशी, नंदु महाजन, प्रविण जाधव,विनोद खैरनार यांनी गणेश चव्हाण याला त्याच्या राहत्या गावातून ताब्यात घेऊन अटक केली.
दुसऱ्या घटनेत 2021 मध्ये शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा जवळ मोहम्मद आसिफ इसा शहा यांची स सुमारे 2 लाख 80 हजार रुपये किंमतीची रिक्षा चोरीस गेली होती. याबाबत शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379 अन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास चाळीसगाव शहर पोलीस कसोसीने करीत असतांना संशयित शेख फारुख उर्फ लावारीश शेख गफ्फार (52) रा. अब्दुल खालीक नगर, सर्वे नं 42(Aअे) प्लॉट नं.33, नया ईस्लामपुरा, मालेगाव जि, नाशिक याने ही रिक्षा चोरी केल्याची माहिती पोना. दिपक पाटील यांना मिळाली.शेख फारूख यास खुलताबाद पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणात अटक केली होती. त्यास चाळीसगाव शहर पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याकडे सखोल चौकशी करता त्याने रिक्षा चोरीची कबुली देऊन सदरची रिक्षा काढून दिली. शेख यास 25 रोजी अटक करण्यात न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली. फारूख शेख हा सराईत गुन्हेगार असुन तो लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने मोटार सायकलस्वार, रिक्षाचालक, चारचाकी वाहन यांच्याकडेस मदत मागून त्यांनी लिफ्ट दिली असता त्यांना विश्वासात घेऊन त्यांना गुंगीकारक औषध मिश्रीत कचोरी, पेढे असे खाऊ घालून ते बेशुध्द होताच त्यांच्या ताब्यातील रिक्षा किंवा मोटार सायकल चोरी करुन पळ काढत असे. फारूख शेख याच्या विरोधात खुलताबाद, मालेगाव व इतर ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध पोलीस अधिक्षक एम राजकुमार,अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीसांनी घेतल्याची माहीती शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यंानी दिली.या दोन्ही गुन्ह्यांचा तपास दिपक पाटील व अमोल भोसले करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here