Home बुलढाणा दूरसंचार कंपन्यांच्या ५जी स्पेक्ट्रमच्या स्पर्धेची रंगीत तालीम

दूरसंचार कंपन्यांच्या ५जी स्पेक्ट्रमच्या स्पर्धेची रंगीत तालीम

102
0

आशाताई बच्छाव

IMG-20220731-WA0028.jpg

दूरसंचार कंपन्यांच्या ५जी स्पेक्ट्रमच्या स्पर्धेची रंगीत तालीम

युवा मराठा नयुज वेब पोर्टल
प्रतिनिधी:- रवि शिरस्कार

सद्या इंटरनेट हे जगभरातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा,व्यवहाराचे फार मोठे माध्यम बनलेले आहे यामध्ये दूरसंचार कंपन्यांचा फार मोठा पुढाकार आहे. सद्या आपन यातील 4G सेवेचा आनंद घेत आहो.पुढील काळात सगळे वायरलेस इंटरनेट तंत्रज्ञान हे पाचव्या पिढीत स्थलांतरित होईल, 5जी मुळे इंटरनेटचा वेग प्रचंड वाढून आपणास इंटरनेट हे बुलेट रेल्वे, विमान, हायपरलूप ह्यातही वापरता येईल

5जी हे करोडो मोबाईल धारक सामावून घेणारे तंत्रज्ञान असेल, सद्याच्या 4जी नेटवर्क मध्ये एक स्केअर किलोमीटर मध्ये 1000 कनेक्शन सामावून घेन्याची क्षमता आहे नंतर जेव्हा जास्त यूजर झाले की 4G चा वेग कमी होतो ती अडचण 5जी मध्ये राहणार नाही यात लाखोंच्या संख्येत युजर्सना लाभ होईल.
यामध्ये कंपन्या आपसात खुप मोठया प्रमाणावर स्पर्धत उतरल्या आहेत
५जी स्पेक्ट्रमचा लिलाव शनिवारी सलग पाचव्या दिवशी सुरू राहिला. आतापर्यंत ५जी स्पेक्ट्रमसाठी कंपन्यांनी १,४९,८५५ कोटी रुपयांच्या बोली लावल्या आहेत. उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, ५जी स्पेक्ट्रमसाठी दूरसंचार कंपन्यांत तीव्र स्पर्धा असल्यामुळे लिलाव प्रक्रिया पाचव्या दिवसांपर्यंत पोहोचली आहे. शनिवारी कंपन्यांनी २४ व्या फेरीसाठी बोली लावल्या आहेत. शुक्रवारपर्यंत लिलावाच्या २३ फेऱ्या झाल्या होत्या. दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी म्हटले होते की, विक्रीस ठेवण्यात आलेल्या एकूण स्पेक्ट्रमपैकी ७१ टक्के स्पेक्ट्रम विकले गेले आहे. लिलावास कंपन्यांकडून मिळालेला

प्रतिसाद समाधानकारक आहे. या लिलावात दूरसंचार विभागाने ४.३ लाख कोटी रुपयांचे ७२ गीगाहर्ट्ज स्पेक्ट्रम विक्रीसाठी ठेवले आहे. या लिलावात रिलायन्स जिओ, भारती एयरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी एंटरप्राइजेस या कंपन्या सहभागी झाल्या आहेत.

बयाणा जमा झालेली रक्कम
दूरसंचार विभागाच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, 4जी स्पेक्ट्रम खरेदीसाठी
VI(व्होडाफोन आयडिया) कंपनीने २,२०० कोटी रुपये, भारती एअरटेलने ५,५०० कोटी रुपये,
अदानी डेटा नेटवर्क्सने १०० कोटी रुपये,
रिलायन्स जिओने १,४०० कोटी रुपये बयाणा रक्कम म्हणून जमा केले आहेत.

लिलावात विकल्या जाणाऱ्या ५जी स्पेक्ट्रमची वैधता २० वर्षांची असेल. लो फ्रिक्वेन्सी बैंड, मीडियम आणि हाय फ्रिक्वेन्सी बैंड रेडिओ वेव्हजचा हा लिलाव आहे. यात यशस्वी झालेल्या कंपन्या लवकरच ५जी दूरसंचार सेवा देतील याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Previous articleअमडापूर बस स्थानक परिसरात अनाथ यूवक
Next articleमुखेड येथील कै. गोविंदराव मक्काजी राठोड शासकीय अभ्यासिकेचे उद्घाटन.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here