Home जळगाव मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी प्रवर्गामध्ये समावेश करावा...

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी प्रवर्गामध्ये समावेश करावा यासाठी सकल मराठा समाजाचे सतत ८ दिवसांपासून साखळी उपोषणाची टाळ मृदुंगाच्या गजरात सांगता

112

आशाताई बच्छाव

IMG-20230928-WA0041.jpg

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी प्रवर्गामध्ये समावेश करावा यासाठी सकल मराठा समाजाचे सतत ८ दिवसांपासून साखळी उपोषणाची टाळ मृदुंगाच्या गजरात सांगता

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने सतत ८ दिवसांपासून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषण करण्यात आले.मुख्यमंत्री यांना चाळीसगाव तहसीलदार द्वारा सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने निवेदन देवून साखळी उपोषणाची टाळ मृदुंगाच्या गजरात सांगता करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यभर मराठा समाजाचे मोर्चे आंदोलन सुरू आहेत तरी देखील शासन आरक्षणा बाबत उदासिन भूमिका घेत असल्यामुळे नाइविलाजास्तव आंदोलनाची दिशा बदलावी लागत आहे ,दि २० ते २७ सप्टेंबर २०२३ पर्यंत सतत ८ दिवस चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर संविधानिक पध्दतीने सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घंटानाद,डफ बजाब,टाळ मुर्दुंग वाजवून आंदोलन करण्यात आले तरी देखील शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात आज पर्यत कुठलीही भूमिका स्पष्ट केली नाही,मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जवळपास ४८ समाज बांधवांनी आत्मबलीदान केले तरी देखील शासनाला जाग येत नसल्याने मराठा समाजात शासना विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. मराठा आरक्षणा संदर्भात शासनाने त्वरित निर्णय घेउन मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवून ओ बी सी प्रवर्गामध्ये समाविष्ट करावा असे न झाल्यास येणाऱ्या काळात मराठा समाज सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकेल एकाही मंत्री व नेत्यांना चाळीसगाव तालुक्यात फिरु देणार नाही,तसेच एक महिन्यात मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास राज्यभर मराठा समाजाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा मुख्यमंत्री यांना तहसीलदार चाळीसगाव द्वारा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला.उपोषणात गणेश पवार, दिलीप पाटील, खुशाल पाटील,प्रा चंद्रकांत ठाकरे, प्रमोदबापु पाटील,मनोज भोसले,विजय ( पप्पू ) पाटील, सुदर्शन देशमुख, प्रदीप देशमुख,किशोरबापु देशमुख, राजेंद्र पाटील, गोकुळ पाटील, संजय देशमुख,खुशाल बिडे,नाना शिंदे ,संजय पाटील, प्रदीप मराठे, पी एन पाटील,धनंजय देशमुख, सुनील चव्हाण,किशोर पाटील,आर बी जगताप, अनिल पाटील,शिवाजी देशमुख,बाळासाहेब देशमुख,मंगेश वाबळे, विजय शितोळे , प्रा .काकासाहेब निकम ,शेखर देशमुख,देवेंद्र पाटील,हितेंद्र मगर,प्रा सुनील जाधव,भाऊसाहेब पाटील,संजय पाटील,भरत नवले,मुकुंद पवार,राजेंद्र शिंदे,केशव पाटील,नाना पाटील,संदीप जाधव,सुधीर पाटील,राकेश निकम,सागर पाटील,रांजणगाव सरपंच प्रमोद चव्हाण तर मालती जगताप,सोनाली बोराडे,मनीषा पाटील, अनिता चव्हाण,लिलाबाई पाटील तर निलेश गायकवाड सह तेजस गायकवाड,भैय्यासाहेब पाटील यांनी भावगिते स्वरांजली मध्ये गायन केल्यामुळे परीसरात भक्तीमय वातावरण तयार झाले, साखळी उपोषणाला आम आदमी पार्टीचे अध्यक्ष ॲड राहुल जाधव, शेतकरी संघटनेचे संदीप पाटील, संगणक परीचालक ग्रामपंचायत पाठिंब्याचे पत्र दिले, तर प्रिंप्री चे मा. उपसरपंच राजेंद्र मोरे , मा.नगरसेवक दिपक पाटील,सोमसिंग राजपूत,सुरेश चौधरी,शिवसेनेचे भीमराव खलाणे तर संतोष राजपूत,जगदीश महाजन यांनी पाठिंबा दर्शवला.

Previous articleरिक्षा व मोटारसायकल चोरटे चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात
Next articleमाळेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबारायाच्या चरणी नारळ फोडून शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.