Home नांदेड माळेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबारायाच्या चरणी नारळ फोडून शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा...

माळेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबारायाच्या चरणी नारळ फोडून शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

116

आशाताई बच्छाव

IMG-20230928-WA0066.jpg

माळेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबारायाच्या चरणी नारळ फोडून शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ

लोहा प्रतिनिधी
अंबादास पाटिल पवार
दैनिक युवा मराठा

लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूक होऊ घातली असून 07 ऑक्टोबर रोजी लोहा बाजार समितीचे मतदान होणार आहे, शेतकरी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार सेवा सहकारी सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघातील विक्रांत श्यामसुंदर शिंदे,चंद्रसन ईश्वरराव पाटील, स्वप्नील मोहनराव पाटील उमरेकर, भास्करराव चंद्रकांत ढगे, दत्ता रेश्माजी दिघे ,साहेबराव रावसाहेब काळे, धोंडीबा रघुनाथ पवार सेवा सहकारी महिला राखीव मतदारसंघ पुनम विश्वंभर क्षीरसागर , सयंत्राबाई रत्नाकर सर्जे इतर मागासवर्गीय सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून बसवेश्वर वैजनाथ धोंडे, विमुक्त जाती सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून केशव सिताराम तिडके ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून वाकडे लक्ष्मीबाई उत्तमराव, आणासाहेब दत्तात्रेय पवार , ग्रा.आर्थिक दृष्ट्या मतदारसंघातून केंद्र केरबा रामराव,मधुकर महादू डाकोरे,व्यापारी मतदारसंघातून बाबाराव धोंडीबा शेटे , अंगद व्यंकटी मोरे व हमाल मतदारसंघातून कंधारे भाऊराव मोतीराम यांच्या शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारार्थ आज दिनांक 27 सप्टेंबर बुधवारी शेकाप,काँग्रेस,मण्याड फाउंडेशन,शिवा संघटना, बी.आर.एस.सर्व पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत श्री.क्षेत्र खंडोबाच्या मंदिरामध्ये सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने श्री क्षेत्र खंडोबारायांचे चरणी नारळ फोडून शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला यावेळी शेकाप, काँग्रेस,शिवा संघटना,मण्याड फाउंडेशन,शिवसेना,बी.आर.एस युतीच्या वतीने लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे समितीच्या प्रचाराची नारळ फोडण्यात आले, यावेळी शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे,माजी आमदार रोहिदास चव्हाण,मण्याड फाऊंडेशनचे अध्यक्ष एकनाथ पवार,आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांचे चिरंजीव तथा युवा नेते राहुल हंबर्डे, मा.जि.प.सदस्य चंद्रसेन पाटील,जिल्हा नियोजन समिती सदस्य एकनाथ मोरे,जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संजय भोसीकर, मा.जि.प.सदस्य विजयराव धोंडगे,मा.जि.प.सदस्य रंगनाथ भुजबळ, मा.जि.प.सदस्य श्रीनिवास मोरे,खरेदी विक्री संघ उपसभापती श्याम अण्णा पवार,तालुका काँग्रेस कमिटी लोहा तालुकाध्यक्ष शरद पवार,तालुका काँग्रेस कमिटी कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे,माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार,मा.सभापती कंधार ज्ञानेश्वर चोंडे,शेकाप जिल्हाध्यक्ष बालाजी इसादकर सह आघाडीचे पदाधिकारी,कार्यकर्ते, सोसायटीचे चेअरमन,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, हमाल मापाडी बांधव व मतदार बहुसंख्येने उपस्थित होते.