राजेंद्र पाटील राऊत
फिरते पशुवैद्यकिय दवाखान्याचे आमदार रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन (संजय कोंकेवार युवा मराठा न्यूज देगलूर) आज देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या हस्ते फिरते पशुवैद्यकीय दवाखान्याचे देगलूर येथे महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मुख्यमंत्री पशुशासकीय योजनेअंतर्गत फिरता पशुवैद्यकीय दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती संजय वल्लकले, जिल्हा परिषद माजी सभापती माधवरावजी मिसाळे, खानापूर सर्कल पंचायत समिती सदस्य गिरीधर पाटील सुगावकर, नगरसेवक अनिल बोंनलावार, बालाजी पा.थडके पशुवैद्यकीय तालुका चिकित्सालय डॉ. काटमवार साहेब, पंचायत समितीचे खानसोडे साहेब सर्व पशुवैद्यकीय कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते .आपण माणसासाठीच रुग्णवाहिका असू शकते हे पाहिले आहे. पण मुख्या जनावरासाठी सुद्धा रुग्णवाहिका तेवढीच महत्वाची आहे हे दाखवून आज या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले आहे या आघाडी सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात 280 पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी रुग्णवाहिका देण्यात आले आहे. त्यापैकी प्रथम रुग्णवाहिका देगलूर येथील लोकप्रिय आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या पाठपुराव्याने प्रथम रुग्णवाहिका देगलूर बिलोली दोन रुग्णवाहिका मंजूर करून प्रथम देगलूर येथे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.




