Home माझं गाव माझं गा-हाणं सटाणा नगरपरिषदेला पडला विसर कोनशिलेचा राजेंद्र देवरेचे उपोषण आंदोलन सुरु…..!

सटाणा नगरपरिषदेला पडला विसर कोनशिलेचा राजेंद्र देवरेचे उपोषण आंदोलन सुरु…..!

114
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा नगरपरिषदेला पडला विसर कोनशिलेचा
राजेंद्र देवरेचे उपोषण आंदोलन सुरु…..!
(दावल पगारे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
लखमापूर,दि.१६– सटाणा शहरातल्या बस स्थानकासमोरील महात्मा ज्योतीबा फुले पुतळा अनावरण प्रसंगी पुतळ्याला लावण्यात आलेली कोनशीला नेमकी कुठे टाकली याचाच विसर सटाणा नगरपालिकेला पडल्याने,आता नवीनच वाद उफाळून आला आहे.
पुढील महिन्यात ११एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी होत असतानाच सदरची कोनशीला गायब होण्यामागचे नेमके रहस्य काय?असा सवाल आता सटाणावासिय उपस्थित करीत आहेत.
वास्तविक सन १९७१ ते ७३ या सालात कै.कृष्णा नानाजी देवरे,सदस्य जयराम गंगाराम वाणी,नारायण केदू येवला,वेदूनाथ गणपत मोरे,पांडूरंग संपत सोनवणे,पांडूरंग नथू मोरे,श्रीमती विठाबाई यशवंत महिरे आदिच्या कार्यकाळात सदरची कोनशीला पुतळ्याला होती.
मात्र गत एक वर्षापुर्वी पुतळा सुशोभिकरणाच्या नावाखाली सटाणा नगरपरिषदेने ज्या लोकप्रतिनिधीनी सटाणा शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी योगदान दिले त्याचीच कर्तबगारी असलेली कोनशीला गायब करुन,विद्यमान लोकप्रतिनिधीच्या नावाची कोनशीला बसविली.
हा त्या लोकप्रतिनिधीचा अपमान असून,नगरपरिषदेने तात्काळ सटाणा शहरवासियांची माफी मागून पुर्वीची असलेली कोनशीला सन्मानपुर्वक बसवावी या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दामू देवरे यांनी सटाणा नगरपालिकेसमोर उपोषणास सुरुवात केल्याने नगरपालिका प्रशासनाची चांगलीच ताराबंळ उडाली आहे.   (बातम्या जाहिरातीसाठी संपर्क 9075750003)

Previous articleफिरते पशुवैद्यकिय दवाखान्याचे आमदार रावसाहेब अंतापूरकर साहेब यांच्या हस्ते उद्घाटन (
Next articleउस्मानाबादेत लाँजवर छापा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलां व पुरुषांना अटक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here