Home मराठवाडा उस्मानाबादेत लाँजवर छापा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलां व पुरुषांना अटक

उस्मानाबादेत लाँजवर छापा वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलां व पुरुषांना अटक

248

राजेंद्र पाटील राऊत

उस्मानाबाद 16 मार्च⭕ युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी ⭕
तुळजापूर
– महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे वास्तव्य असलेल्या तीर्थक्षेत्र ठिकाणी एका लॉजवर स्थानिक पोलिसांच्या कृपेने राजरोस वेश्या व्यवसाय सुरु होता. त्याची थेट तक्रार पोलीस अधीक्षकाकडे करण्यात आली होती.एसपीच्या आदेशानंतर या लॉजवर आज छापा मारण्यात आला आहे.

लातूर रोडवरील मयुर लॉजवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारला असता, वेश्या व्यवसाय करणाऱ्या ९ महिला आणि सात ते आठ पुरुष सापडले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

लातूर रोडवरील या लॉजवर गेल्या अनेक दिवसापासून राजरोस वेश्या व्यवसाय सुरु होता, मात्र स्थानिक पोलीस त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत होते. त्याची थेट तक्रार पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्याकडे करण्यात आली होती.

एसपीच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही वेळापूर्वी या लॉजवर छापा मारला असता, त्यावेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या ९ महिला आणि सात ते आठ पुरुष सापडले आहेत.

या लॉज मालकाचे आणि स्थानिक पोलिसांचे साटेलोटे सुरु होते. महिन्याला चिरीमिरी सुरु होती. त्यामुळे ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप ‘ असे सुरु होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मारलेल्या छाप्यात चक्क ९ महिला आणि सात ते आठ पुरुष सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

या सर्वावर तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Previous articleसटाणा नगरपरिषदेला पडला विसर कोनशिलेचा राजेंद्र देवरेचे उपोषण आंदोलन सुरु…..!
Next articleटीचर प्रीमिअर लीग(खेड) मध्ये आर डी फायडर्स संघ विजेता तर उपविजेता मामाचे लाडके संघ 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.