• Home
  • टीचर प्रीमिअर लीग(खेड) मध्ये आर डी फायडर्स संघ विजेता तर उपविजेता मामाचे लाडके संघ 🛑

टीचर प्रीमिअर लीग(खेड) मध्ये आर डी फायडर्स संघ विजेता तर उपविजेता मामाचे लाडके संघ 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210317-WA0050.jpg

🛑 टीचर प्रीमिअर लीग(खेड) मध्ये आर डी फायडर्स संघ विजेता तर उपविजेता मामाचे लाडके संघ 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

खेड:-⭕रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐतिहासिक गोळीबार मैदान मध्ये येथे १३ आणि १४ मार्च २०२१ रोजी टीचर प्रीमिअर लीग संपन्न झाली.

या स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले होते.मामाचे लाडके – मामा जंगम,हॅपी टिचर्स टायगर – संतोष उतेकर,R D फायटर्स – सौ राजश्री डोळसे, SM चॅलेंजर्स – श्री . संजय सुर्वे / अनिल मोरे,योध्दे शरदचे – श्री शरद भोसले, पवार फायटर्स – श्री सुखदेव पवार.ही क्रिकेट स्पर्धा लीग पध्दतीने खेळविण्यात आली होती. टॉप ४ संघ बाद फेरीत आले,पहिल्या २ क्रमांकावर असणाऱ्या टिमपैकी जी टिम जिंकेल ती अंतिम फेरीत,३ आणि ४ क्रमांकावर एलिमिटर पद्धतीने जिंकणारी टिम वरील २ पैकी हरलेल्या टिम सोबत पुन्हा खेळेल या पद्धतीने सामने झाले. विजेता – R D फायटर्स, उपविजेता – मामाचे लाडके,तृतीय – SM चॅलेंजर्स,चतुर्थ – हॅपी टिचर्स टायगर,उत्कृष्ट फलंदाज – संतोष वाबळे(मामाचे लाडके),उत्कृष्ट – गोलदांज – लक्ष्मण नेहेरकर(R D फायटर्स),उत्कृष्ट क्षेत्ररक्षक -R K चव्हाण – (पवार वॉरिअर्स), मालिकावीर – पुरुषोत्तम पाटील- (R D फायटर्स),या स्पर्धेत अनेक खेळांडूनी उत्तुंग खेळ केला.

यामध्ये सुनिल पांगुळ,विकास राठोड,दिलीप काकडे, विक्रमजीत कापसे,सचिन गमरे, रुपेश उतेकर इत्यादी खेळाडूंनी या स्पर्धेत आपल्या खेळाची छाप पाडली.श्री राजेंद्र चांदिवडे, अविनाश साळुंखे, सानप यांसह आयोजन समितीने उत्कृष्ट नियोजनबद्ध आणि कोवीड 19 च्या सर्व नियमांचे पालन करत ही स्पर्धा यशस्वी पार पाडली.⭕

anews Banner

Leave A Comment