Home कोकण बालकलाकार आर्यन विलास पाटील याला रत्नसिंधू प्रज्ञा गौरव पुरस्कार 🛑

बालकलाकार आर्यन विलास पाटील याला रत्नसिंधू प्रज्ञा गौरव पुरस्कार 🛑

82
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 बालकलाकार आर्यन विलास पाटील याला रत्नसिंधू प्रज्ञा गौरव पुरस्कार 🛑
✍️ चिपळूण 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

चिपळूण :⭕तालुक्यातील परशुरामचा बालकलाकार आर्यन विलास पाटील याला रत्नसिंधू प्रज्ञा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

दिनांक 21 मार्च 2021 रोजी सकाळी 10 वाजता माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कुमार आर्यन विलास पाटील याला सदरचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

चिपळूण तालुक्यातील परशुराम गावचा सुपुत्र असलेला बालकलाकार आर्यन पाटील हा एस पी एम इंग्लिश मेडीयम स्कुल परशुराम येथे सहावीत शिकत आहे त्याचे वय अवघे अकरा वर्षे आहे.

त्याने आतापर्यंत चार लघुपट व दोन चित्रपटात काम केले आहे. चित्रकार या लघुपटातील अभिनयाबद्दल बालकलाकार आर्यन विलास पाटील याला एका वर्षात *52* राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय *सर्वोत्कृष्ट बालकलाकार* पुरस्कार मिळाले आहेत.

त्याच्या या यशात त्याचे गुरू दिग्दर्शक श्री शिवाजी मालवणकर लेखक श्री नंदा आचरेकर, पराग शेटे आणि चित्रकार च्या संपूर्ण टीमचे आर्यनच्या या अपूर्व यशात मोलाचे योगदान आहे.
नुकताच तेजस फौंडेशन नाशिक यांचेकडून *समाजरत्न* पुरस्कार जाहीर झाला आहे तसेच बुलडाणा फिल्म सिटी तर्फे दिला जाणारा देशातील मानाचा *राष्ट्रीय कला गौरव* पुरस्कार देखील जाहीर झाला आहे.

कला क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल बालकलाकार आर्यन विलास पाटीलची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

आर्यन पाटील याला मनाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे…⭕

Previous articleटीचर प्रीमिअर लीग(खेड) मध्ये आर डी फायडर्स संघ विजेता तर उपविजेता मामाचे लाडके संघ 🛑
Next articleअसगणी गावात पांडवकालीन स्वयंभु महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here