• Home
  • देगलुरात एकाच दिवशी 28 जण कोरोना बाधित

देगलुरात एकाच दिवशी 28 जण कोरोना बाधित

राजेंद्र पाटील राऊत

20210316_180456.jpg

देगलुरात एकाच दिवशी 28 जण कोरोना बाधित (संजय कोंकेवार युवा मराठा न्यूज देगलूर)देगलूर शहरातील साधना शाळेतील 20 विद्यार्थी तर ओपीडीतील आठ जणांचा समावेश असून, जिल्ह्यातील मागील काही दिवसापासून कोरोना संसर्गाने पुन्हा मुसंडी घेतली आहे. देगलूरात आज सोमवार दिनांक 15 मार्च या एकाच दिवशी 28 जन बाधितआल्याने प्रशासनासह नागरिकात एकच खळबळ माजली आहे. शहरातील साधना शाळेतील विद्यार्थ्यांचा व उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील आठ जणांचा समावेश असल्याची माहिती, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आकाश देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात कोरोणा चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने दिनांक 12 मार्च ते 21 मार्च या कालावधीत आस्थापनावर काही निर्बंध घातले आहेत. मात्र यावर अंकुश ठेवणारी नगरपालिका, महसूल, व पोलीस प्रशासनाने बेफिकीर असल्यामुळे शहरासह तालुक्यातील नागरिक ना.. मास्क ,ना..सोशल डिस्टन्स, ना.. सॅनिटायझर या त्रिसूत्री कोरोना ढालीचा वापर करत नसल्यामुळे दिवसागणिक कोरोणा संसर्ग बळावत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. गेल्या पंधरवड्यात शहरासह तालुक्यातील 39 जण बाधित झाले होते. यापैकी साधना माध्यमिक शाळेतील दोन शिक्षकांचा समावेश होता. त्या अनुषंगाने शाळेतील दहाव्या वर्गातील 100 विद्यार्थ्यांची सोमवारी दिनांक 15 मार्च रोजी अँटीजन तपासणी केली असता, 20 विद्यार्थी बाधित आढळून आले. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. तर त्याच दिवशी येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्दी, ताप ,खोकला आलेल्या 26 रूग्णांची तपासणी केली असता, यामध्ये आठ रुग्ण बाधित आढळून आले. विविध क्षेत्रात तपासणी मोहीम राबवली तर नक्कीच शेकडोंच्या संख्येत हा आकडा जाईल यात कोणतेही दुमत दिसून येत नाही. यावर आळा बसविण्यासाठी देगलूर स्थानिक प्रशासनाकडून कठोर पावले उचलणे गरजेचे बनले आहे.

anews Banner

Leave A Comment