Home माझं गाव माझं गा-हाणं वासोळ गावी वीज कर्मचाऱ्यांना मारहाण पोलिसात गुन्हा दाखल

वासोळ गावी वीज कर्मचाऱ्यांना मारहाण पोलिसात गुन्हा दाखल

174

राजेंद्र पाटील राऊत

वासोळ गावी वीज कर्मचाऱ्यांना मारहाण पोलिसात गुन्हा दाखल
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा : वासोळ येथे थकीत  वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. त्यामुळे वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून याबाबत सहायक अभियंता दीपक गांगुर्डे यांनी देवळा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मंगळवार (दि.१६) रोजी  तालुक्यातील वासोळ येथे रामदास सखाराम गवळी यांच्याकडे वीज बिलाची थकीत रक्कम असल्याने वीज वितरण कंपनीचे कर्मचारी गोरख निकम व नितीन पवार हे वसुलीसाठी गेले असता गवळी यांनी विज बिल भरण्यास नकार दिला. तसेच सदर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. निकम यांनी शिवीगाळ करू नको असे सांगितले असता रामदास गवळी, अनिल गवळी, गोरख गवळी, घरातील इतर महिला व पुरुषांनी निकम यांच्यासह पवार यांना मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक संजय मातोंडकर हे अधिक तपास करीत आहेत. दिवसेंदिवस वीज वसुली करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होत असल्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous articleपीएम मोदी यांची उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक
Next articleदेगलुरात एकाच दिवशी 28 जण कोरोना बाधित
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.