Home सामाजिक पीएम मोदी यांची उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

पीएम मोदी यांची उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

135
0

राजेंद्र पाटील राऊत

पीएम मोदी यांची उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे.
१७ मार्च रोजी होणाऱ्या या बैठकीत पंतप्रधान मोदी कोरोनाची वाढती प्रकरणे आणि लसीकरणावर भर देण्याबाबत चर्चा करतील. यावेळी पंतप्रधान मोदी कोरोनाची लढाई आणि लसीकरण मोहिमेवर मुख्यमंत्र्यांचे अभिप्राय देखील घेतील.
पीएम मोदी १७ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेतील. कोरोनाचा प्रादुर्भावसोबतच पंतप्रधान मोदी देशात लसीकरण सुरू झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
अशा परिस्थितीत पंतप्रधान राज्यांमधील लसीकरणाची प्रगती व त्यातील अडचणींचा आढावा घेतील. महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे वाढली आहेत.
गेल्या २४ तासांत देशात २६ हजारांहून अधिक नवीन प्रकरणे आढळून आली असून, त्यापैकी ७८ टक्के प्रकरणे या पाच राज्यातील आहेत. त्याचबरोबर यापैकी ६३टक्के पेक्षा जास्त प्रकरणे केवळ महाराष्ट्रात आढळली आहेत.
आकडेवारीनुसार, ८५ दिवसांनंतर देशात सर्वाधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी २० डिसेंबर रोजी २४ तासांत २६,६२४नवीन प्रकरणे नोंदवली गेली होत्ती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, विषाणूमुळे ११८ रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर देशात मृतांचा आकडा १,५८,७२५ झाला आहे.

Previous articleकोल्हापूर  जिल्ह्यात आजअखेर 48 हजार 849 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज
Next articleवासोळ गावी वीज कर्मचाऱ्यांना मारहाण पोलिसात गुन्हा दाखल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here