Home माझं गाव माझं गा-हाणं नाशिक =शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने तयार केले...

नाशिक =शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने तयार केले ॲप, बळीराजाची सुरक्षा आता ॲपवर अवलंबून

97
0

राजेंद्र पाटील राऊत

नाशिक =शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने तयार केले ॲप, बळीराजाची सुरक्षा आता ॲपवर अवलंबून
प्रतिनिधी =किरण अहिरराव युवा मराठा न्युज नेटवर्क

नाशिक=बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांची तोतया व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी बाजार समितीने कृषी उत्पन्न ॲप तयार करून ॲपच्या माध्यमातून बळीराजाची सुरक्षा करण्याचा निर्णय घेतलाय बाजार समितीने शेतकऱ्याच्या सुरक्षतेसाठी तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून घर बसून शेतमाल बाजार भाव समजणार आहे.
देविदास पिंगळे यांच्या हस्ते या ॲपच उद्घाटन करण्यात आले . बाजार समितीत शेतकऱ्याची लिलाव प्रक्रिया दरम्यान व्यापारी, हमाल, आडते यांच्याकडून अडचण भासल्यास संबंधित विभागा च्या कर्मचाऱ्यांकडे तक्रार करता येणार आहे . शेतकऱ्यांसाठी हे ॲप विनामूल्य दिले जाणार असून ॲप सदस्य नोंदणी देखील सोपी आहे. अँड्रॉइड मोबाईल मध्ये प्लेस्टोर मध्ये प्रवेश करत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती असे नाव टाकल्यास असे ॲप ओपन होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक व फसवणूक करणारे आता रडारवर आले आहेत. हे मात्र निश्चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here