Home उतर महाराष्ट्र माळी घोगरगाव येथे पवित्र क्रसाच्या वाटेची भक्ती मोठ्या भक्ती भावाने संपन्न

माळी घोगरगाव येथे पवित्र क्रसाच्या वाटेची भक्ती मोठ्या भक्ती भावाने संपन्न

17
0

आशाताई बच्छाव

IMG_20240318_182345.jpg

माळी घोगरगाव येथे पवित्र
क्रसाच्या वाटेची भक्ती मोठ्या
भक्ती भावाने संपन्न
टिळकनगर/श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी: फ्रान्सिसकन धर्मगुरु फा. जाकियर बाबा
यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या व पवित्र वेलांकनी
मातेच्या तिर्थक्षेत्राने प्रसिद्धी
पावलेल्या माळी घोगरगाव
येथे टिळकनगर धर्मग्रामाच्या
वतीने प्रायश्चित काळा निमित्त
आयोजित पवित्र कुसाच्या वाटेची भक्ती मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाली .
मोळी घोगरगाव येथील
ख्रिस्तराजा चर्चमध्ये भाविकांनी पवित्र क्रसाच्या
वाटेची भक्ती केली. तसेच
याप्रसंगी पवित्र मिस्सा बलिदान अर्पण करण्यात आला . तत्पूर्वी भाविकांनी
प्रायश्चित संस्कार स्विकारला .
याप्रसंगी भाविकांनी
फा. जाकियर बाबा यांच्या
कबरेचे दर्शन घेवून आपल्या
मनोकामना पूर्ण होण्यासाठी
प्रार्थना केली. तसेच पवित्र
वेलांकनी मातेच्या चर्चमध्ये
जाऊन भक्तीभावने प्रार्थना
केली. त्यानंतर प्रीतिभोजन
करण्यात आले. हि पवित्र
कुसाची वाट व आध्यात्मिक
सहल यशस्वी करण्यासाठी
माळी घोगरगाव येथील
ख्रिस्तराजा चर्चचे प्रमुख धर्मगुरू व संत जोसेफ हायस्कूलचे मुख्याध्यापक
फा.आशिष म्हस्के यांनी
विशेष सहकार्य केल्याबद्दल
त्यांचे आभार मानण्यात आले
तसेच सहाय्यक धर्मगुरू
फा. प्रविण वानखेडे यांचेही
आभार मानण्यात आले
ह्या आध्यत्मिक सहलीचे
प्रेरणास्त्रोत टिळकनगर
धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरु
फा. मायकल वाघमारे व
सहाय्यक धर्मगुरू
फा.संजय पठारे , आनंद
विहारच्या सुपिरियर सिस्टर
उषा ,सिस्टर पुनम व या
आध्यात्मिक सहलीसाठी
विशेष परिश्रम घेणारे
पॅरिश कौन्सिलचे उपाध्यक्ष
राजेंद्र भोसले सर सहलीसाठी
स्कूल बसेस उपलब्ध करून
दिल्याबद्दल डि पॉलचे फादर
थॉमस यांचेही विशेष आभार
मानले तसेच बसचालक व
वाहक विशाल तेलोरे , प्रमोद
संसारे, नितिन जाधव , अतिश
साळवे व राजुरी येथील जॉन
कदम व श्री बनसोडे व उपस्थित भाविकांचे मनःपूर्वक
आभार मानण्यात आले .
या आध्यात्मिक सहलीत
सुमारे १०० भाविकांनी
सहभाग घेतला .
सर्वांचे आभार .

Previous articleबौद्ध समाजास उमेदवारी मिळाल्यास सर्व समाज घटकांचा जाहिर पाठिंबा
Next articleएकाच घरावर दोनदा कर्ज, एसबीआयचे ३० लाख हडपले.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here