Home नांदेड मुखेड येथील गुरु रविदास फुटवेअरला व्हिकेसी प्राइड राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार.

मुखेड येथील गुरु रविदास फुटवेअरला व्हिकेसी प्राइड राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार.

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20230706-WA0074.jpg

मुखेड येथील गुरु रविदास फुटवेअरला व्हिकेसी प्राइड राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार

मुखेड येथील दिगंबर जमदाडे यांच्या सुप्रसिद्ध गुरु रविदास फुटवेअरला वीकेसी प्राईड इंडिया तर्फे दिला जाणारा सन 2022- 23 यावर्षीचा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योजकता / मेगा रिवार्ड पुरस्कार केरळ येथील (कोची) येथे प्रदान करण्यात आला.
गुरु रविदास फुटवेअरला चाळीस वर्षाची परंपरा लाभली असून या फुटवेअरचे मालक दिगंबराव जमदाडे गोणारकर यांनी अगदी मेहनतीने छोटया रोपट्यापासुन वटवृक्षापर्यतचे संगोपन इथपर्यंतचा यशस्वी प्रवास ग्राहक व मित्र परिवाराच्या सहकार्यामूळेच दिसुन येते. त्यांनी ग्राहकांशी टिकवून ठेवलेले अतुट नाते, आत्मीयत्तेचे राहिलेले आहे. यातून त्यांनी सामाजिकता जोपासली आहे हे पहावयास मिळते. असंख्य ग्राहकांना अगदी विश्वासाने दिलेले योगदान आजपर्यंत त्यांच्या कार्यातुन त्यांनी विश्वास हीच परंपरा कायमp ठेवून यश संपादन केले आहे. तिमाही, सहामाही, वार्षिक खप कंपनीचे डेकोरेशन, सतत जाहीरात, सामाजिक योगदान लक्षात घेऊन पुरस्कारात राज्यातून दुसऱ्या क्रमांकाची निवड केली आहे. या फुटवेअरला आतापर्यंत यापूर्वी चार वेळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दिगंबरराव जमदाडे यांच्या केलेल्या सततच्या प्रामाणिक मेहनतीला , जिद्दीला यश मिळत आहे अशी जनसामान्यात चर्चा व्यक्त होत आहे. व्हिकेसी प्राइड पुरस्कार हा व्हिकेसी प्राईड कंपनीचे MD व्हिकेसी रज्जाक, कौशलैंद्रसिंग, अमोल जैन (महा) जनरल मॅनेजर ,शहाबाद पटेल , इलियास पटेल परभणी , प्रफुल बलई कळंब , तसेच तौफीख पटेल लातुर यांच्या उपस्थितीत केरळ (कोची ) येथे व्हिकेसी प्राइड राष्ट्रीय संमेलनात प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल गुरु रविदास फुटवेअर चे मालक दिगंबरराव जमदाडे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Previous articleशहादा जिल्हा सत्र न्यायालय व दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कोर्टाचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न
Next articleरामसेतू हा प्रेमाचा आणि सर्वधर्मसमभावाचा सेतू -पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here