Home जळगाव ‘राष्ट्रीय विधी सेवा दिवस’ निमित्त दिवाणी न्यायालय व.स्तर चाळीसगाव येथे शिबीर संपन्न’

‘राष्ट्रीय विधी सेवा दिवस’ निमित्त दिवाणी न्यायालय व.स्तर चाळीसगाव येथे शिबीर संपन्न’

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20231110_085112.jpg

‘राष्ट्रीय विधी सेवा दिवस’ निमित्त
दिवाणी न्यायालय व.स्तर चाळीसगाव येथे शिबीर संपन्न’

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे दि.०९/११/२०२३ रोजी ‘राष्ट्रीय विधी सेवा दिवस’ निमित्त तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव आणि तालुका वकील संघ चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव एन.के.वाळके यांचे अध्यक्षतेखाली शिबीर घेण्यात आले.
सदर शिबीरात अॅड. कविता जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व सुत्रसंचालन केले. रमेश सुधाकर पोतदार यांनी ‘राष्ट्रीय विधी सेवा दिवस’ वर आधारीत कविता सादर केली. अॅड. कौस्तुभ भगवान पाटील यांनी ‘राष्ट्रीय विधी सेवा दिवस’ या विषयावर मार्गदर्शन केले. अॅड. लव हरी राठोड यांनी ‘ज्येष्ठ नागरिकांचे मुलभूत कर्तव्ये’ मार्गदर्शन केले. सचिनकुमार भुपेंद्र दायमा, यांनी ‘राष्ट्रीय शैक्षणिक दिवस’ या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश व.स्तर चाळीसगाव एन.के.वाळके यांनी आपले अध्यक्षीय भाषणात ‘कायदेशीर स्वंयसेवकासाठी सुधारित योजना’, ‘ए.डी.आर.पध्दती आणि त्याचे फायदे, या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर शिबीरात एस.डी.यादव, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग चाळीसगाव, ए.एच.शेख तिसरे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग चाळीसगाव, अॅड. भगवान आर. पााटील, अॅड. दिपीका चौधरी, अॅड. आकांक्षा निकम, देवेश दिपक पवार, तसेच न्यायालयीन अधिक्षक अार.एस.सावदेकर, जी.आर.पवार व कर्मचारी वृंद उपस्थित होते. तालुका विधीसेवा समिती तर्फे कार्यक्रमाचे आयोजन डी.के.पवार,वरिष्ठ लिपीक व डी.टी.कु-हाडे, क.लिपीक, तुषार अनिल भावसार, शिपाई यांनी पाहिले. अॅड.श्री.संग्रामसिंग एस. शिंदे, सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केेले व कार्यक्रमाची सांगता केली.

Previous articleचाळीसगाव तहसील कार्यालयात कुणबीच्या नोंदी शोध मोहीम सुरू
Next articleविठ्ठल कॉर्पोरेशन लि. म्हैसगांव कारखान्याचा ऊस दर प्रती मे.टन २७००/- रुपये जाहीर – आमदार संजयमामा शिंदे .
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here