Home सोलापूर विठ्ठल कॉर्पोरेशन लि. म्हैसगांव कारखान्याचा ऊस दर प्रती मे.टन २७००/- रुपये जाहीर...

विठ्ठल कॉर्पोरेशन लि. म्हैसगांव कारखान्याचा ऊस दर प्रती मे.टन २७००/- रुपये जाहीर – आमदार संजयमामा शिंदे .

175

आशाताई बच्छाव

IMG_20231110_085619.jpg

विठ्ठल कॉर्पोरेशन लि. म्हैसगांव कारखान्याचा ऊस दर प्रती मे.टन २७००/- रुपये जाहीर – आमदार संजयमामा शिंदे .

सोलापूर
माढा

विठ्ठल कॉर्पोरेशन लि. म्हैसगांव तालुका माढा या साखर कारखान्याचे विस्तारीकरण अल्पावधी कालावधी मध्ये करुन कारखान्याचा १६ वा गाळप हंगाम सन २०२३ २४ सुरळीतपणे सुरु झालेला आहे. तसेच ऊस तोडणी वाहतुक यंत्रणाही कारखान्याकडे पुरेश्या प्रमाणामध्ये उपलब्ध झालेली आहे.
या चालू गाळप हंगाम सन २०२३ २४ करीता गाळपास येणा-या ऊसासाठी पहिला अॅडव्हान्स हप्ता विठ्ठलराव शिंदे सह. सा.का. लि. पिंपळनेर या कारखान्याप्रमाणेच प्रती मे.टन २७०० रुपये प्रमाणे सभासद व बिगर सभासद ऊस पुरवठादार शेतक-यांना अदा करणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
या प्रसंगी विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक यशवंत शिंदे, मुख्य कार्यकारी आर.एस. रणवरे, कार्यकारी सल्लागार विजयकुमार गिलडा, असि. जनरल मॅनेजर वैभव काशिद, चिफ इंजिनिअर मोहन पाटील, चिफ केमिस्ट प्रदीप केदार, डिस्टीलरी मॅनेजर अनिल शेळके, मुख्य वित्तीय अधिकारी भास्कर गव्हाणे, मुख्य शेती अधिकारी महेश चंदनकर, परचेस अधिकारी- कल्याण पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रदीपकुमार पाटील, एच. आर. मॅनेजर-परमेश्वर माळी, विठ्ठल कॉर्पोरेशन मधील विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Previous article‘राष्ट्रीय विधी सेवा दिवस’ निमित्त दिवाणी न्यायालय व.स्तर चाळीसगाव येथे शिबीर संपन्न’
Next articleमुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.