• Home
  • मुंबई, पुण्यातील ‘त्या’ भागातील लोकांबाबत धक्कादायक माहिती समोर

मुंबई, पुण्यातील ‘त्या’ भागातील लोकांबाबत धक्कादायक माहिती समोर

🛑 मुंबई, पुण्यातील ‘त्या’ भागातील लोकांबाबत धक्कादायक माहिती समोर 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 12 जून : ⭕ महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहे. अशातच जो भाग कोरोनाचा हॉटस्पॉट आणि कंटेन्मेंट झोन ठरला आहे. अशा भागातील 15 ते 30 लोकांना कोरोनाची लागण झाली असावी, अशी शक्यता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (आयसीएमआर) व्यक्त केली आहे. दैनिक लोकमत आणि इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील कंटेन्मेट झोनमधील  एक तृतीयांश नागरिकांना कोरोनाची बाधा झाली असावी. यातून ते बरेही झाले असावेत, असं आयसीएमआरनं एका सर्वेक्षणात म्हटलं आहे. परंतु, आयसीएमआरने हा अहवाल अद्याप प्रसिद्ध केला नाही. जो परिसर कंटेन्मेंट झोन्स आणि हॉटस्पॉट्स म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्या परिसरातील जवळपास 30 लोकसंख्याही कोरोनाच्या विळख्यात सापडली असावी. आयसीएमआरने आपल्या अहवालात ही बाबनमूद केली आहे. याबद्दलची माहिती  केंद्रीय कॅबिनेट सचिव आणि पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आली आहे. देशातील मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद आणि इंदूर या शहरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढला आहे. या भागात 100 टक्के संसर्गाची नोंद करण्यात आली आहे. आयसीएमआर केलेल्या संशोधनात  मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, सूरत, दिल्ली, कोलकाता, इंदूर, जयपूर आणि चेन्नई या शहरातून नमुने गोळा केले होते. यात शहरातील कंटेन्मेंट झोनमधून 500 नुमने गोळा करण्यात आले होते. यासोबतच 21 राज्यातील 60 जिल्ह्यातून प्रत्येकी 400 नमुने गोळा करण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे, देशातील एकूण रुग्ण संख्येपैकी 70 टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे, अहमदाबाद, सूरत, दिल्ली, कोलकाता, इंदूर, जयपूर आणि चेन्नई या शहरात आढळून आले आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे 2553 नवीन रुग्ण समोर आले. यासह राज्यात आता एकूण 88 हजार 528 रुग्ण आहेत. तर, 109 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह मृतांची संख्या 3,169 झाली आहे. तर, मुंबईत 50 हजार 085 नवीन रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 1709 लोकांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर 1661 रुग्ण निरोगी होऊन घरीही परतले आहे. यासह महाराष्ट्रातील निरोगी रुग्णांचा आकडा हा 40 हजार 975 झाला आहे. ⭕

anews Banner

Leave A Comment