Home कोरोना ब्रेकिंग महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती? पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतरमास्क मुक्तीचा निर्णय निर्णयाची शक्यता;

महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती? पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतरमास्क मुक्तीचा निर्णय निर्णयाची शक्यता;

72
0

Anshuraj Patil

महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती? पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतरमास्क मुक्तीचा निर्णय निर्णयाची शक्यता;

मुंबई (अंकुश पवार, मुंबई जिल्हा प्रतिनिधी, युवा मराठा वेब न्युज चॅनल अँड पेपर

महाराष्ट्र हे मास्क मुक्तीचा निर्णय घेणारं पहिलं राज्य ठरलं होतं. मात्र आता हा निर्णय मागे घ्यावा लागतो की काय याबद्दलच्या चर्चा सुरु झाल्यात.
देशातील करोना रुग्णांची संख्या मागील दोन आठवड्यांमध्ये पुन्हा वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये मागील काही दिवसांमध्ये दिवसाला एक हजारहून अधिक रुग्ण आढळून आलेत. मुंबईमध्ये रविवारी विक्रमी १४४ रुग्ण आढळून आले. मुंबईतही करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आढावा बैठक बोलवली आहे. या बैठकीमधील चर्चेनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा मास्क सक्तीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या या बैठकीमध्ये सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सहभागी होण्यास सांगण्यात आलंय. मास्क सक्तीवर बैठकीनंतर निर्णय होण्याची शक्यता राज्यात पुन्हा चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मुखपट्टी वापराची सक्ती लागू करण्याची सूचना डॉक्टरांच्या कृतीगटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना परिस्थितीबाबत आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलाविली आहे. त्यानंतर संबंधितांशी विचारविनिमय करून राज्य सरकार मास्क सक्तीबाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.
देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकारीही या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे. या शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि या दोन्ही मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीमध्ये असतील. या बैठकीमध्ये करोना रुग्णसंख्येची वाढ रोखण्यासाठी राज्यांना निर्देश देण्याबरोबरच काही धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
समोर आलेल्या माहितीनुसार आरोग्य सचिव राजेश भुषण हे या बैठकीमध्ये सध्या देशातील करोना परिस्थितीसंदर्भात एक प्रेझेन्टेशन देणार आहेत. यामध्ये ते करोना लसीकरणासंदर्भात आणि विशेष करुन बुस्टर संदर्भात माहिती देणार आहेत. कोणत्या राज्यामध्ये सध्या काय परिस्थिती आहे याची सविस्तर आकडेवारी या बैठकीमध्ये सादर केली जाणार आहे.
महाराष्ट्रात करोना परिस्थिती नियंत्रणात असली तरी रुग्णसंख्या वाढत आहे. चीनसह काही देश आणि देशातील काही राज्यांमध्येही करोना रुग्ण आढळून येत आहेत. करोना विषाणूंचे उत्परिवर्तन हा चिंतेचा विषय असून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे मत ज्येष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत व्यक्त केले.
…म्हणून मास्क सक्तीचा विचार
राज्यात मास्क सक्ती काढून टाकण्यात आली व तिचा वापर ऐच्छिक ठेवण्यात आला. तेव्हापासून बहुसंख्य नागरिकांना मास्कचा वापर बंद केला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून काही गर्दीच्या ठिकाणी तरी मास्क वापर सक्तीचा करण्यासाठी राज्य सरकार पावले टाकण्याचा विचार करीत आहे, असे ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्लीमध्ये मास्क सक्ती हटवण्यात आल्यानंतर दोन आठवड्यांनी एप्रिलच्या मध्यातच रुग्णसंख्या वाढू लागली. रुग्णसंख्या कमी झाल्याने दिल्ली सरकारने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शाळा पुन्हा सुरु करत मास्क सक्ती हटवली होती. पण एप्रिलच्या मध्यातच रुग्णसंख्या वाढू लागली आणि दोन आठवड्यात १०० वरुन एक हजारवर पोहोचली. पण याआधी दिल्लीत झालेल्या रुग्णवाढीच्या तुलनेत ही वाढ तितकी नाही.

Previous articleमुखेड तालुक्यातील रस्त्याना भस्मासुरांचे स्वरुप! गोजेगाव ,मुक्रमाबाद ते रावी रस्ता बनला मौत का कुवा
Next articleजैताणे-निजामपुर डाॅक्टर, संघटनेच्या अध्यक्षपदी डॅा.महेश विठ्ठलराव ठाकरे यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here