Home नांदेड मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना केवायसीची मोठी डोकेदुखी  केवायसी तारीख वाढून द्या. शेतकऱ्यांकडून मागणी

मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना केवायसीची मोठी डोकेदुखी  केवायसी तारीख वाढून द्या. शेतकऱ्यांकडून मागणी

98
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना केवायसीची मोठी डोकेदुखी

केवायसी तारीख वाढून द्या. शेतकऱ्यांकडून मागणी

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

पीएम किसान योजनेंतर्गत चार महिन्याला दोन हजार रुपये मिळण्यासाठी आता ३१ मार्च २०२२ पर्यंत केवायसी करणे आवश्यक असल्याने ठरवुन दिलेल्या वेळेत केवायसी पुर्ण होत नसल्याने सद्याला मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना केवायसी करणे डोकेदुखी ठरत असुन शासनाने केवायसी ची तारीख वाढवुन द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

सद्याला ई – केवायसी करण्यासाठी अनेक अडथळे येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे . सीएससी सेंटरमध्ये तासनतास बसावे लागत आहे . कधी साईट जाम तर कधीकधी ई – केवायसी चालू असताना अचानक वीज पुरवठा बंद होत आहे . तसेच काही शेतकऱ्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे उमटत नसल्याने त्यांना केवायसी पासून मुकावे लागत आहे . त्यातच आता अंतिम मुदतही जवळ आल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे . ३१ मार्च शेवटची तारीख आहे ‌ कृषी विभागाकडून आलेल्या यादीनुसार पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत . त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना निधी मिळू नये , यासाठी आता ई – केवायसीची अट घालण्यात आली आहे . त्यामुळे अकराव्या हप्त्याचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे . शेतकरी अगोदरच नापिकीमुळे हैराण झालेला असून , आता केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई – केवायसी बंधनकारक केली आहे . परंतु , अनेकांच्या बोटांचे ठसे उमटत नसल्याने हे शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत . शिवाय ग्रामीण भागात वीजेचा प्रश्न गंभीर असल्याने अनेकांची ई – केवायसी बाकी आहे . त्यामुळे शासनाने तारीख वाढवून देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विठ्ठल पाटील येवतीकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here