• Home
  • जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बरबडा व कन्या शाळा बरबडा यांच्यावतीने गुरूगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न.

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बरबडा व कन्या शाळा बरबडा यांच्यावतीने गुरूगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220321-WA0041.jpg

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बरबडा व कन्या शाळा बरबडा यांच्यावतीने गुरूगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व कन्या शाळा बरबडा यांच्यावतीने तालुका गुरुगौरव पुरस्कार मिळालेल्या गुणीजन शिक्षकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. तालुकास्तरीय गुरु गौरव पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतरगाव येथील श्री.किशन पंचलिंग सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटोदा येथील श्री. दयानंद खिंडे सर, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील सौ. राजश्री भैराट मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईजतगाव येथील सौ. सुषमा पोलशेटवार मॅडम व जिल्हा परिषद कन्या शाळा बरबडा येथील श्री.अंबुलगे दत्ता सर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी बरबडा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. माधव रेडेवाड सर केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. गुंटे सर कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. खंदारे सर आणि दोन्ही शाळेचे सर्व शिक्षक वृंद श्री.विभुते सर श्री. मार्गेपवार सर श्री.आलूरे सर श्री.शिवदास कुंभारगावे सर, श्री शिंदे सर व कन्या शाळेचे श्री. कुंभारगावे प्रकाश सर, जिल्हास्तरीय गुरुगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.शेवाळे शिवाजी सर श्री. सूरेवाड साहेब सर श्री. दिलीप जेटेवाड सर सौ. विद्युलता करडखेले मॅडम. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडी येथील मुख्याध्यापक श्री.जेटेवाड सर, अंगणवाडी ताई , मदतनीस उपस्थित होते. यावेळी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मार्गेपवार गोविंद सर तर आभार प्रदर्शन श्री सूरेवाड सरांनी केले.

anews Banner

Leave A Comment