Home नांदेड मुखेड पंचायत समितीवर प्रशासक नियुक्ती  गटविकास अधिकारी भालके यांनी स्विकारला पदभार

मुखेड पंचायत समितीवर प्रशासक नियुक्ती  गटविकास अधिकारी भालके यांनी स्विकारला पदभार

106
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड पंचायत समितीवर प्रशासक नियुक्ती

गटविकास अधिकारी भालके यांनी स्विकारला पदभार

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड पंचायत समितीच्या सभापती पदासह उपसभापती व १२ सदस्यांचा पाच • वर्षाचा कालावधी १३ मार्च रोजी • संपल्यामुळे प्रशासकाची नियुक्ती केली असून गटविकास तुकाराम भालके यांनी मुखेड पंचायत समितीचा 7 प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला आहे . पंचायत समितीच्या राजकीय कारकिर्दीत पाच दशकात पहिल्यांदाच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे प्रशासकीय पदासह प . स . चा कारभार हाती आला आहे . मुखेड पंचायत समिती अंतर्गत १२ ९ ग्रामपंचायती असून या सर्व ग्रामपंचायतीवर येथून नियंत्रण ठेवले जाते . गावांच्या विकासासाठी १५ वा वित्त आयोगाचा भरघोस निधी , घरकुल योजना , मनरेगा पांदण रस्ता , विहीर बांधकाम , दलित वस्ती आदींसह विविध योजना पंचायत समिती मार्फत राबविल्या जातात . आता गटविकास तुकाराम भालके हे आगामी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत . जि.प. च्या अध्यक्षा मंगारणी अंबुलगेकर यांसह ६ जि.प. सदस्यांचा पंचवार्षिक कार्यकाळ येत्या २० मार्च रोजी संपुष्टात येत आहे .
तालुक्यात पहिल्यांदाच नगरपालिका , पंचायत समिती व जिल्हा परिषद हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था लोकप्रतिनिधिंच्या निवडी विनाच रिक्त झाल्या असून सर्व सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपत असल्यामुळे कार्यालयाचा कारभार प्रशासकाच्या हाती येत आहे . एक ते दीड महिन्यात बाजार समितीवर सुद्धा प्रशासकीय प्रशासक येण्याची शक्यता आहे , त्यामुळे यापुढे शासकीय कार्यालयावर प्रशासक राज पहावयास मिळणार आहे .

Previous articleजिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बरबडा व कन्या शाळा बरबडा यांच्यावतीने गुरूगौरव पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार समारंभ संपन्न.
Next articleकंचनपुर येथील भागवत कथा सप्ताहाची सांगता गाव … कंचनपुर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here