• Home
  • कंचनपुर येथील भागवत कथा सप्ताहाची सांगता गाव … कंचनपुर

कंचनपुर येथील भागवत कथा सप्ताहाची सांगता गाव … कंचनपुर

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220321-WA0099.jpg

कंचनपुर येथील भागवत कथा सप्ताहाची सांगता
गाव … कंचनपुर                                                               अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

कंचनपुर येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची शनिवार दिनांक 19 मार्च रोजी सांगता झाली. या सप्ताहाचे आयोजन गुरुवर्य हभप तुकाराम महाराज सखारामपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते…..हभप लक्ष्मण महाराज,सावरपाटी यांचे काल्याचे कीर्तन आणि कंचनपुर येथील ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद होऊन सांगता झाली. संध्याकाळी टाळ मृदंगाच्या निनादात “ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या गजरात भाविकांनी गाव प्रदक्षिणा केली. कंचनपुर येथील सांप्रदायिक मंडळाच्या वतीने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.सप्ताहात सात दिवस भागवताचार्य, हभप राजेंद्र महाराज वक्ते,पाळोदी यांनी भागवत कथा कथन करून भाविकांना भगवत भक्तीत तृप्त केले. तसेच दैनंदिन कीर्तन, भजन, हरिपाठ, काकड आरती, हरिजागर आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते….सप्ताहामध्ये हभप बळीराम महाराज चोरे,कंचनपुर , हभप केशव मोरे महाराज,म्हैसपूर , हभप बाजीराव महाराज,इलोरा , हभप माणिकराव महाराज,कोकलवाडी,हभप गोपाळ महाराज उरळकर, हभप अरुण महाराज लांडे पारस,हभप सारंगधर महाराज मेहुनकर,हभप लक्ष्मण महाराज सावरपाटी यांची कीर्तन सेवा झाली. यावेळी पंचक्रोशीतील टाळकरी मंडळी तसेच श्री.संत गजानन महाराज महिला भजनी मंडळ कंचनपुर,बाल भजनी मंडळ कंचनपूर यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने सप्ताहात सहभागी झाले होते.

anews Banner

Leave A Comment