• Home
  • पाटबंधारे उप विभागाची पाणी पट्टी वसुली सुरू

पाटबंधारे उप विभागाची पाणी पट्टी वसुली सुरू

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220321-WA0112.jpg

पाटबंधारे उप विभागाची पाणी पट्टी वसुली सुरू

जिंतूर प्रतिनिधी विष्णु डाखुरे युवा मराठा न्युज नेटवर्क
:- दि २१/०३रोजी जिंतूर तालुक्यातील पाटबंधारे उप विभाग क्र.२ शाखा येलदरी अंतर्गत ल.पा.तलाव दहेगाव ,भोसी,कोरवाडी कावी या गावांची पाणी पट्टी वसुली सुरू झाली आहे. यावेळी विभागाचे कालवा (निरीक्षक) एम.ऐल.शेळके,( द.का.) मेश्राम, एकनाथ शेळके इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांच्या अध्यक्षतेखाली पाटबंधारे उप विभागाची पाणी पट्टी वसुल करण्यात आली. तसेच कालवा निरीक्षक शेळके यांचे
कावी ,दहेगाव शिवारातील शेतकरी ग्रामस्थांना पाणी पट्टी वसुल करण्यास योग्य ते सहकार्य करावे .असे आवाहन करण्यात आले. या ठिकाणी कावी गावातील (सरपंच) रामभाऊ काठमोरे, (उप सरपंच ) गणेश थोरवे, (पोलीस पाटील ) प्रविण तरटे ,रामा घुगे, कैलास थोरवे , भगवान घुगे, सोपान काठमोरे , दादाराव लिपणे, तुळशिराम घुगे आदिंची उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment