• Home
  • शासकीय रुग्णालयात होणार आज दिव्यांग तपासणी शिबिर

शासकीय रुग्णालयात होणार आज दिव्यांग तपासणी शिबिर

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220321-WA0085.jpg

शासकीय रुग्णालयात होणार आज दिव्यांग तपासणी शिबिर
(संग्रामपूर युवा मराठा न्युज संग्रामपूर सिटी प्रतिनिधी रवि शिरस्कार)
संग्रामपूर येथे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा परिषद बुलढाणा द्वारे शासन निर्णयानुसार संग्रामपूर तालुक्यातील सर्व प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग संगणकीय प्रमाणपत्र व यूडीआय डी कार्ड मिळण्यासाठी तपासणी कार्यक्रम दिनांक 22.3. 2022 मंगळवार ला शासकीय रुग्णालय संग्रामपूर येथे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत दिव्यान्ग शिबीर स्थळी येऊन आपली तपासणी करून घ्यावी ज्या शहरी व ग्रामीण आदिवासी भागातील दिव्यांगांनी ह्या शिबिरात सहभाग नोंदवून शासनाच्या मिळणाऱ्या सोयी-सुविधांचा लाभ घेण्यासाठी शिबीर स्थळी उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी मेरत साहेब यांनी केले आहे हे तपासणी शिबिर तहसीलदार वरणगावकर साहेब, ना. तहसीलदार चव्हाण साहेब, गटविकास अधिकारी संजय पाटील साहेब , गटशिक्षणाधिकारी श्री ढगे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ रुदरकर साहेब यांचे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न होत आहे तपासणी शिबिराला डॉक्टर पवार साहेब डॉक्टर जयंत सोनवणे डॉक्टर बघे, श्रडॉ मानकर डॉक्टर शिंदिकर डॉक्टर चरके, दिव्यांग तज्ज्ञ जयश्री ताई गिते,तसेच नगराध्यक्षा उषा ताई सोनोने, गजानन वाघ महाराज यांचे उपस्थित होणार आहे, तरी जास्तीतजास्त संख्येने दिव्यांगानी शिबिराचा लाभ घ्यावा असे मुख्याध्यापक डॉ. गजानन मुंढेश्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय शेगांवयांनी केले.

anews Banner

Leave A Comment