राजेंद्र पाटील राऊत
महिलानी आर्थिक स्वसाह्यता निर्माण केल्यास त्या कुटुंबाची प्रगती निश्चित. तालुका प्रतिनिधी, नायगाव,माधव किशनराव घाटोळे
सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर
नांदेड येथील नवीन मोढा येथे महिला बचत गटाच्या उत्पादनाचे भव्य प्रदर्शन 20 मार्च रोजी जागतिक महिला दिना निमित्ताने संपन्न झाले. यावेळी निराधार व विधवा महिलाना शिलई मशीन चे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख उदघाटक भाजपा महिला मोर्चा प्रदेशउपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर यानी महिलानी आर्थिक स्वसाह्यता निर्माण केल्यास त्या कुटुंबाची प्रगती निश्चित होईल आसे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन महिला मोर्चा युवती जिल्हाध्यक्ष सौ.माधवी मठपती यानी केले होते.या कार्यक्रमासाठी भाजपा नांदेड महानगरध्यक्ष प्रविणभाऊ साले.प्र.का,सदस्य सौ.डाँ.शितल भालके.शतंतारका पांढरे.अशोक मामा धनेगांवकर.अँड दिलीप ठाकुर.सुर्यकांत कदम.अनिलसिंह हाजारी.बजरंगसिग ठाकुर.आदि प्रमुख उपस्थिती होती.
महिलाना आर्थिक सक्षमता निर्माण होण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून आनेक घरगुती व्यवसाय निर्मीती करण्यासाठी भाजपा सरकार तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वोत्तम पद्धतीने कार्य करत आहेत.यासाठी आपण महिलानी यात सहभागी होऊन या बचत गटातील विविध योजनेचा लाभ घेतल्यास आपले कुटुंब आर्थिक सक्षम बनेल आसेही यावेळी सौ,प्रणिताताई देवरे-चिखलीकर यानी मनोगत व्यक्त केले.यावेळी नविन मोढा भागातील मोठ्या प्रमाणात महिलाची गर्दी या ठिकाणी होती. यावेळी प्राथमिक स्वरुपात शिलाई मशिन वाटप करण्यात आले. महीलाचे नाव . मानसी कोतावार नांदेड. दैवशाला थुताडे वसरनी. शिवकाता मटपती नांदेड. जयश्री हाळदेकर हाळदा. अर्चना जाधव.नांदेड.यावेळी लक्ष्मीबाई वाघमारे.आश्वीनी सोनुले.कुणाल गजभारे यानी परिश्रम घेतले.