• Home
  • १०४ ग्रा.पं.च्या ३२२ सदस्यांसाठी धोक्याची घंटा ! मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका तहसीलदारांनी यादी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

१०४ ग्रा.पं.च्या ३२२ सदस्यांसाठी धोक्याची घंटा ! मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका तहसीलदारांनी यादी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220321-WA0077.jpg

१०४ ग्रा.पं.च्या ३२२ सदस्यांसाठी धोक्याची घंटा !

मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केल्याचा ठपका
तहसीलदारांनी यादी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

ग्राम विकास विभागाच्या परिपत्रकारनुसार मागासवर्गीय प्रवर्गासाठी आरक्षित जागेवरून विजयी झालेल्या ग्राम पंचायत सदस्याने सादर केलेल्या हमी पत्रानुसार निर्धारित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे . तालुक्यातील १०४ ग्राम पंचायतीतील ३२२ ग्रा.पं. सदस्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही त्यामुळे अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे . यापैकी ५२ जणांनी मुदतीनंतर तहसीलमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे . या सर्वांबाबतचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे . याबाबतच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .मुखेड तालुक्यातील १०८ च्या आसपास ग्राम पंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जाने – फेब्रुवारी २१ मध्ये झाली . यात अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , नागरिकाचा मागास प्रवर्ग यातील राखीव जागेवर आरक्षण सोडतीनुसार उमेदवार विजयी झाले . २१ जानेवारी २१ रोजी जाहीर प्रगटन प्रसिध्द केल्यानुसार २० जानेवारी २२ पर्यंत विजयी उमेदवारांनी जात
वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते . ज्या ग्राम पंचायत सदस्याने जात वैधता प्रमाणपत्र निर्धारित मुदतीत सादर केले नाही त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे . तालुक्यातील १०४ ग्राम पंचायतीत ३२२ सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर केले नाही तर यातील ५२ सदस्यांनी मुदतीनंतर जात वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे . त्यात सांगवी बा ०२ , अडलूर / नांदगाव ०१ , भासवडी / बिहारीपुर ०१ , बेटमोगरा ०५ , सावळी ०३ , दापका गुं ०७ , होकर्णा ०२ , वाळंकी ०२ , हिरानगर ०२ , वंडगीर ०२ , कुंदराळा ०४ , बेन्नाळ ०३ , परतपूर ०५ , गोणेगाव ०२ , भिगोली ०२ , एकलारा ०३ , सलगरा खु ०४ , खतगाव पदे ०२ , चांडोळा ०५ , चोंडी ०३ , हसनाल पदे ०४ , दापका राजा ०६ , होंडाळा ०४ , कोटग्याळ / वसंत नगर ०१ , आखरंगा ०२ , हिप्परगा दे ०३ , वडगाव ०१ , माकणी ०५ धनज / जामखेड ०२ , चिवळी ०१ , सांगवी बे ०३ , मुक्रमाबाद ०४ , मेथी / खपराळ ०२ , ताग्याळ ०२ , मंडलापूर ०२ , मारजवाडी ०३ , येवती ०६ , राजुरा बु , मंगयाळ ०५ , हिब्बट ०२ , कलंबर ०५ , सावरगाव पी ०२ , कमळेवाडी ०५ , बापशेटवाडी ०२ , डोरनाळी ०३ , वर्ताळा / शेळके वाडी ०४ , इटग्याळ पमु ०४ , केरूर ०२ , डोंगरगाव ०१ , जाहुर ०३ , बाऱ्हाळी ०३ , देगाव ०६ , उंदरी पमु ०६ , सावरमाळ ०५ , बामणी ०४ , तारतडवाडी १ , तुपदाळ खु ०२ , आंदेगाव ०१ , गोजेगाव ०५ , कोटग्याळवाडी ०२ , जिरगा ०२ , कोळनूर ०५ , माऊली ०२ , उच्चा बु ०४ , बावलगाव ०४ , होनवडज ६ , वसुर ०४ , उंद्री पदे ०३ , धामणगाव ०४ , हंगरगा पक ०६ , अंबुलगा बु ०४ , भाटापूर पदे ०२ , खतगाव पमु ०३ , बिल्लाळी ०१ , हळणी ०६ , हंगरगा खु ०२ , हातराळ ०७ , खरब खंडगाव ०२ , उमरदरी ०३ , जांब खु ०३ , रावणगाव ०२ , भगणूरवाडी ०४ , सकनूर ०३ , शिकारा ०३ , जांभळी ०१ , रावी ०१ , मोटरगा ०४ , बोमनाळी ०१ , पांडुरणी ०३ , पाळा ०५ , कामजळगा ०२ , हसनाळ पमु ०४ , तांदळी ०२ , कलंबर ०२ , बेरळी बु .०३ , खैरका ०३ , लखमापुर ०३ , शिरूर दबडे ०१ , नांदगाव पक ०२ , हिप्परगा दे ०२ , लादगा ०४ , बेरळी खु . मांजरी ०१ ,, कलंबर ४ यांचा समावेश आहे . ८० जणांनी मुदतीच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र दिले आहे . ही यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आली असे तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी सांगितले .

anews Banner

Leave A Comment