Home नांदेड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची देगलूर तालुका कार्यकारणी जाहीर

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची देगलूर तालुका कार्यकारणी जाहीर

236
0

राजेंद्र पाटील राऊत

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची देगलूर तालुका कार्यकारणी जाहीर
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशान्वये, नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड व जिल्हा कार्याध्यक्ष विशाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची देगलूर तालुका व शहर कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची देगलूर तालुका कार्यकारिणी अशी :
सुनील मदनुरे देगलूर तालुका अध्यक्ष, चंद्रकांत गज्जलवार तालुका उपाध्यक्ष, संतोष मंनधरणे तालुका सचिव, ईश्वर देशमुख तालुका कोषाध्यक्ष, मनोज बिरादार तालुका संघटक, एकनाथ गाडीवान तालुका सह सचिव, दादाराव बेळीकर तालुका सह-कोषाध्यक्ष, उमाकांत कोकणे देगलूर शहर अध्यक्ष, मलिकार्जुन कडलवार शहर उपाध्यक्ष, अमित पाटील शहर सचिव आदी पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. येत्या काळात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, देगलूर तालुक्याच्या वतीने पत्रकार व त्यांचे कुटुंब, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रामध्ये खूप कार्य करणार असल्याचे देगलूर तालुका अध्यक्ष सुनील मदनुरे यांनी यावेळी सांगितले. देगलूर तालुका कार्यकारिणीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघाचे राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकार्‍यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here