• Home
  • मल्टिपेशालिटी हॉस्पिटल एटापल्लीतच सुरू करण्याची मागणी

मल्टिपेशालिटी हॉस्पिटल एटापल्लीतच सुरू करण्याची मागणी

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220324-WA0040.jpg

मल्टिपेशालिटी हॉस्पिटल एटापल्लीतच सुरू करण्याची मागणी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
एटापल्ली;
तालुक्याच्या नावाने मंजूर असलेले नागेपल्लीला हलविले जाणारे मल्टिपेशालिटी हॉस्पिटल एटापल्लीतच सुरू करण्याची मागणी तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय चरडुके नगरपंचायत बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार व नागरिकांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांचे मार्फत जिल्हाधिकारी संजय मीना यांना निवेदनातून केली आहे.
सुरजागड पहाडीवरून लोहखनिज उत्खनन करणाऱ्या लॉयल्डस मेटल कंपनीकडून सामाजिक सेवेच्या भावनेतून नागरिकांच्या सेवेसाठी एटापल्लीत मल्टिपेशालिटी हॉस्पिटल सुरू करणे अपेक्षित आहे, मात्र कंपनीकडून एटापल्लीच्या नावाचे मल्टिपेशालिटी हॉस्पिटल अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे हलविणे जाणे एटापल्लीच्या नागरिकांवर अन्यायकारक असल्याचे निवेदनातून म्हटले आहे, त्यामुळे एटपल्लीच्या नावाने मंजूर मल्टिपेशालिटी हॉस्पिटल एटापल्लीतच सुरू करण्याची मागणी तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय चरडुके, नगरपंचायत बांधकाम सभापती राघवेंद्र सुल्वावार, नगरसेवक राहुल कुलमेथे, नगरसेवक बिरजू तिम्मा,कॅमुनिस्ट पार्टी तालुका अध्यक्ष सचिन मोतकूलवार, तालुका काँग्रेस युवा अध्यक्ष मोहन नामेवार, भा.ज.पा युवा मोर्चा अध्यक्ष संपत पैडाकुलवार,टायगर ग्रुप अध्यक्ष तनुज बल्लेवार, महेश पुल्लूरवार, देवाजी दुग्गा, पवन महा, गोंगलु झोरे, रामसू दुग्गा, सूरज जक्कोलवार, वैभव सोमनकर, शशांक कंपेलवार व नागरिकांनी केली आहे.

anews Banner

Leave A Comment