Home Breaking News 🛑 **पुणे दौऱ्यात…! मुख्यमंत्र्यांकडून अमोल कोल्हेंची विशेष दखल….! औषधांच्या काळाबाजारावर कोल्हेंकडून जालीम...

🛑 **पुणे दौऱ्यात…! मुख्यमंत्र्यांकडून अमोल कोल्हेंची विशेष दखल….! औषधांच्या काळाबाजारावर कोल्हेंकडून जालीम उपाय**🛑

88
0

🛑 **पुणे दौऱ्यात…! मुख्यमंत्र्यांकडून अमोल कोल्हेंची विशेष दखल….! औषधांच्या काळाबाजारावर कोल्हेंकडून जालीम उपाय**🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याचा दौरा करत आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या खासदार अमोल कोल्हे यांची विशेष दखल घेतली.

डॉ. अमोल कोल्हे यांनी बैठकीत मांडलेल्या मुद्द्यांची मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाणीवपूर्वक दखल घेतली. त्यांनी 3-4 वेळा डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा आवर्जून उल्लेख केला.

त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांच्यातील नात्याचं अनोखं रुप येथे पाहायला मिळालं.

अमोल कोल्हे म्हणाले, “पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जास्तीतजास्त बेड उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे.

मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यात उपलब्ध करुन द्यावे. अनेकदा डॅशबोर्डवर खाटांची उपलब्धता दिसते, मात्र प्रत्यक्षात तेथे रुग्ण पोहोचतो तेव्हा खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. परिणामी रुग्णांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे डॅशबोर्ड सातत्याने अपडेट करावेत.”

मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांसाठी बेडची सुविधा निर्माण केलेल्या रेल्वे बोगी, व्हेंटिलेटरसह विविध इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यात उपलब्ध करून द्यावे. पुण्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना रुग्णांना आवश्यक औषधं उपलब्ध व्हावीत. विशेषतः रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविर आणि टॉसिलीझुमाब या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी सरसकट या औषधाचा वापर करु नये.

त्याऐवजी रुग्णाला खरोखरच त्याची गरज आहे का याची खात्री करुन या औषधांचा वापर करावा. यातून या औषधांचा काळाबाजार होण्यावर नियंत्रण ठेवता येईल,” अशी सूचना डॉ. कोल्हे यांनी केली.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मांडलेल्या या सूचनांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत आवर्जून दखल घेतली. त्यांनी या बैठकीत 3-4 वेळा डॉ. कोल्हे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याचा आवर्जून उल्लेख केला.

तसेच कोल्हे यांनी सुचवल्याप्रमाणे कोरोनाचा डॅशबोर्ड सातत्याने अपडेट करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना अनेकदा खासदार कोल्हे यांना आपण स्वत: डॉक्टर आहात त्यामुळे आपल्याला हे समजू शकेल असं म्हटलं.

ही बाब उपस्थितांच्याही लक्षात आली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांच्या चांगल्या संबधांचीही चर्चा सुरु झाली आहे.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तामामा भरणे आणि जिल्ह्यातील खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते….⭕

Previous article🛑 *३१ जुलै १८९७* तृतीय छत्रपती राजाराम महाराज यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन …🛑
Next article🛑 **विरोधी पक्षनेत्या कोरोनाग्रस्तांच्या मदतीला जाणार धावून…..! प्लाझ्मा करणार दान!** 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here