• Home
  • 🛑 **विरोधी पक्षनेत्या कोरोनाग्रस्तांच्या मदतीला जाणार धावून…..! प्लाझ्मा करणार दान!** 🛑

🛑 **विरोधी पक्षनेत्या कोरोनाग्रस्तांच्या मदतीला जाणार धावून…..! प्लाझ्मा करणार दान!** 🛑

🛑 **विरोधी पक्षनेत्या कोरोनाग्रस्तांच्या मदतीला जाणार धावून…..! प्लाझ्मा करणार दान!** 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

वारजे / पुणे ⭕शहरामध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात वाढत आहे. तसेच दगावण्याचे प्रमाण जास्त असल्याने अशा गंभीर रुग्णाला दिलासा देण्यासाठी कोरोनातून बऱ्या झालेल्या महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ व त्यांचे कुटुंब प्लाझ्मा दान करणार असल्याची लेखी माहिती धुमाळ यांनी दिली आहे.

तसेच कोविडवर आजतागायत कुठल्याही प्रकारचे रामबाण औषध निघाले नाही. कोरोना बाधित व्यक्ती 28 दिवसानंतर कोणत्याही लक्षणा शिवाय राहिल्यात त्याचा प्लाझ्मा (रक्तश्राव ) दुसऱ्या कोरोना बाधित रुग्णाला देता येतो.

रुग्णाचा  जीव वाचवण्यासाठी बरे झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव दिला तर कोरोना व्यक्तीचा जीव वाचू शकतो. त्यामुळे आम्हीही कोरोनातून बरे झालेलो आहोत.

त्यामुळे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी covid-19 आजरातून  बरे झालेल्या व्यक्तींनी आपले प्लाझ्मा दान करावे असे आवाहन केले होते. त्या आव्हानात प्रतिसाद म्हणून मी व माझे पती प्रदीप धुमाळ व माझा मुलगा मनीष धुमाळ हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्लाझ्मा  दान करण्यास तयार असून त्याबाबत लेखी पत्र धुमाळ यांनी दिले आहे.

तसेच आपण किंवा आपल्या परिचित व्यक्ती ज्यांना कोरोना  होता आणि त्यातून ते बरे झाले असतील त्यांनी प्लाझ्मा दान  करण्यासाठी पुढे यावे. यामध्ये  कोणताही धोका नाही.

प्लाझ्मा दान करण्यामुळे इतर व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे आपण किंवा आपल्या परिचित व्यक्तीनेही प्लाझ्मा दान करण्यासाठी  प्रवृत्त करावे. असे  आवाहनही धुमाळ यांनी यावेळी केले.

(**विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांचा असाही दिलदारपणा; प्लाझ्मा करणार दान**)…..⭕

anews Banner

Leave A Comment