• Home
  • *🛑 **पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही….! अजितदादांचा शब्द**🛑*

*🛑 **पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही….! अजितदादांचा शब्द**🛑*

🛑 **पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही….! अजितदादांचा शब्द**🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :⭕ पुण्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निधीची कमतरता भासू दिली नाही, यापुढेही निधीची कमतरता भासणार नाही.

असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. कोणत्याही परिस्थितीत पुण्याचा कोरोना संसर्ग आटोक्यात आला पाहिजे त्यासाठी प्रशासनाने झटून काम करा, असे निर्देश अजित पवार यांनी दिले.

विधानभवन सभागृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील कोविड व्यवस्थापन व नियोजनाबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे.

कोणत्याही परिस्थितीत ग्रामीण भागात नियंत्रण मिळवा तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेत काम करा, गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच सामाजिक संस्थांना सोबत घेत पुण्याला कोरोनामुक्त करूया, असा आशावाद व्यक्त करतानाच येत्या काही  दिवसात आपण सर्व मिळून कोरोनावर निश्चितपणे मात करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोना बाधित रुग्णांची सद्यस्थिती,  कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या,  बाधित रुग्णांची क्षेत्रनिहाय माहिती, नमुना तपासणी प्रयोगशाळा आदि विषयी तसेच इतर उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या विभागात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

तसेच पुणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त गणेश सोनोने व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी वॉर्डनिहाय कोरोना प्रतिबंधासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते…⭕

anews Banner

Leave A Comment