Home जळगाव संशयीत आरोपीस चोरीच्या पिकअप वाहनासह अटक…. चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी….

संशयीत आरोपीस चोरीच्या पिकअप वाहनासह अटक…. चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी….

93
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231011-055947_Google.jpg

संशयीत आरोपीस चोरीच्या पिकअप वाहनासह अटक….
चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी….

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – भरधाव वेगाने जाणाऱ्या पिक अप वाहनासह मालेगाव येथील एकास चाळीसगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर पिकअप मालेगाव छावणी पोलीस स्टेशन ला चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने संशयीतावर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
7/10/2023 रोजी रात्री चाळीसगाव शहरात गस्त पेट्रोलिंग करीत असतांना रात्री 1 वाजेच्या सुमारास मालेगाव रोड लगत असलेला एल.पी.जी. पंपासमोर मालेगाव कडुन चाळीसगाव शहराकडे एक बोलेरो पिकअप वाहन भरधाव वेगाने येतांना दिसल्याने गस्तीवर असलेले पोलीस नाईक अमृत पाटील, पो कॉ विजय पाटील यांनी सदर वाहन चालकास गाडी थांबविण्याचा इशारा केला असता त्याने पिकअप वाहन न थांबविता भरधाव वेगाने पिकअप वाहन हे चाळीसगाव शहराकडे चालवित नेले. तेव्हा पोलीस अंमलदार यांना सदर वाहनावर अधिक संशय बळावल्याने त्यांनी सदर वाहनाचा पाठलाग करून सदर वाहनास हॉटेल आशिष गार्डन समोर रात्री 1-10 वाजेच्या सुमारास थांबविले. तेव्हा वाहन चालकास तु वाहन एवढ्या भरधाव वेगाने का चालवित आहात असे विचारपुस करता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली, त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे शेख फरान शेख आरीफ 22 रा. अक्सा कॉलनी, हाजरा मस्जिद जवळ मालेगाव जि. नाशिक, असे सांगितले, त्यास वाहनाचे कागदपत्रांबाबत विचारपुस करता त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली पिकअप चोरीचे असल्याबाबत खात्री झाल्याने त्याचेविरोधात पोकॉ विजय पाटील यांचे फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून पिकअप वाहन जप्त करण्यात आले.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा सखोल तपास हवालदार राहुल सोनवणे व पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे यांनी केला असुन गुन्ह्याचे तपासात आरोपीताच्या ताब्यात मिळुन आलेले 5 लाख किंमतीची महिन्द्रा कंपनीची बोलेरो पिकअप वाहन हे छावणी पोलीस स्टेशन मालेगाव ग्रामीण कडील गुरनं. 282 / 2023 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेले असल्याचे गुन्ह्याचे तपासात निष्पन्न झाले.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ राहुल सोनवणे, पोलीस नाईक अमृत पाटील, महेंद्र पाटील, भुषण पाटील, पोकॉ विजय पाटील, आशुतोष सोनवणे, रविंद्र बच्छे, पवन पाटील, ज्ञानेश्वर गिते, ज्ञानेश्वर पाटोळे, समाधान पाटील, राकेश महाजन यांचे पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here