Home गडचिरोली आमची बांधीलकी जनतेशी सत्तेशी नाही गुरूपोर्णीमानिमित्य मा.बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी दिली माताभगिनींना वस्त्रभेट

आमची बांधीलकी जनतेशी सत्तेशी नाही गुरूपोर्णीमानिमित्य मा.बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी दिली माताभगिनींना वस्त्रभेट

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0000.jpg

आमची बांधीलकी जनतेशी सत्तेशी नाही

गुरूपोर्णीमानिमित्य मा.बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी दिली माताभगिनींना वस्त्रभेट

शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकाराने गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा जिल्हा परिषद क्षेत्रातील अमिर्झा-टोेली येथे वस्त्रभेट कार्यक्रम

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूला दैवत मानले जाते.गुरूने दिला ज्ञानरुपी वसा,आम्ही चालवू हा पुढे वारसा या उक्ती प्रमाणे गुरुचे अस्तित्व प्रत्येकाच्या आयुष्यात दिशादर्शकाचे काम करते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मार्गदर्शक रुपाने आपल्याला वेगवेगळ्या गुरुंचे मार्गदर्शन लाभते.अशा या गुरुंना वंदण्यासाठी त्यांनी दिलेल्या ज्ञानाचे ऋण व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू हदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसैनिकांचे नाते हे गुरूशिष्याचेच आहे.हिंदू हदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना समाजसेवेची शिकवण दिली.हिंदू हदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्याप्रती प्रेमभाव जोपासत शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा जिल्हा परिषद क्षेत्रातील अमिर्झा-टोली येथे शेकडो माताभगिंनींना व़स्त्रभेट देऊन गुरूपोर्णिमा साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्ल्यार्पन करण्यात आले -छत्रपति शिवाजी महाराज की जय- -जय भवानी जय शिवाजी-शिवसेना जिंदाबाद-शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो- मा,उद्धव साहेब ठाकरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं””अश्या गंगनभेदी घोषणानि अमिर्झा-टोली परिसर शिवसैनिकानी दनानुन सोडला
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले की, गुरूपोर्णिमा ही आपल्या गुरूप्रती आदर व्यक्त करणारा दिवस आहे. हिंदू हदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे हे आमचे गुरू असून शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे साहेब आमचे मार्गदर्शक आहेत. मा.बाळसाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना ही खऱ्याखुऱ्या आणि कट्टर अशा मावळयांची सेना आहे. संघर्षातूनच शिवसेनचा जन्म झाला आहे.किती अस्मानी संकटे आली तरी आम्ही डगमगणार नाही. मा.बाळासाहेबांनी ज्यांना आधार दिला, त्यांना लहानाचे मोठे करून मोठया पदापर्यंत पोहचविले. परंतू तेच आता उघडपणे बंड करून शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका निर्माण करीत आहेत असे संधीसाधू मा.बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक होवूच शकत नाही. अशी टीका शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी शिवसेनेविरोधात बंड करणाऱ्या विरोधात केली. आपल्याला मोठया पदाची लालसा नसून मा.बाळसाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून अखेर पर्यंत शिवसेना पक्षप्रमुख मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीशी राहून जनसेवेचे अविरत कार्य करीत राहणार,असे कात्रटवार याप्रसंगी म्हणाले.
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य,आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक आहे.अशा गुरूप्रती आदराची भावना जोपासून वस्त्रभेट कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.शिवसेना प्रमुख मा.बाळसाहेब ठाकरे यांचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून मी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून कोणतीही समस्या असल्यास ती माझ्या समोर मांडल्यास मी न्याय मिळवून देण्यासाठी कटीबध्द आहे, असे अरविंदभाऊ कात्रटवार वस्त्रभेट कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले.कोणत्याही निवडणुका नसताना गुरु पौर्णिमेच्या पावन पर्वा निमित्य माता-भगीनिना वस्त्र भेटिचा कार्यक्रम आयोजित करून शिवसेनेने खरोखरच सामाजिक बांधीलकी जपली असून हे कार्य फक्त शिवसेनाच करू शकते असे भावउद्धगार यावेळी अनेक माता-भगिनिनी काढले या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना सहसंपर्क प्रमुख श्री.अरविंद भाऊ कात्रटवार,उपतालुका प्रमुख यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके,संजय बोबाटे,संदीप भुरसे,सूरज उइके,संदीप अलबनकर,निकेश लोहबरे, स्वप्निल खांडरे,अरुण बारपात्रे,प्रशांत ठाकुर,विजय किरंगे,अनिल बानबाले,पाण्डुरंग पानफोले,विकास न्नावरे,अंबादास मुनघाटे,यादवजी चौधरी, छोटू तिवाड़े,अमन वरखडे,आकाश भरणे, निरंजन लोहबरे,तानाबा दजगये,रामचंद्र बह्याल,महेश झोड़े,मोतीराम भुसरे,हर्षल तिवारी,राहुल चुधरी,शुभम बरापात्रे,यांच्या सह गावकारी व शिवसैनिक उपस्थित होते

Previous articleअत्यावश्यक सेवा वगळता शाळा, महाविद्यालये व इतर बाबी राहाणार 16 जुलै पर्यंत बंद।
Next articleखामगावात सर्दी, ताप, डायरीयाचे रुग्ण वाढले.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here