Home बुलढाणा खामगावात सर्दी, ताप, डायरीयाचे रुग्ण वाढले.

खामगावात सर्दी, ताप, डायरीयाचे रुग्ण वाढले.

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20220713-WA0069.jpg

खामगावात सर्दी, ताप, डायरीयाचे रुग्ण वाढले.

विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

खामगाव:- गेल्या काही दिवसापासून हवामानातील होणारा बदल तसेच सध्या पावसाच्या वातावरणामुळे हवेत गारवा वाढला आहे. परिणामी खामगाव शहर आणि तालुक्यात सर्दी ताप, खोकला डायरीयाचे रुग्ण वाढले आहे. खाजगी रुग्णालयानंतर आता अनेकांनी शासकीय रुग्णालयाची वाट उपचारासाठी धरली आहे त्यामुळे शासकीय रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात दररोज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या आता तीन अंक पार झाली आहे गेल्या काही दिवसापासून पावसाळी वातावरण आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात काही भागात पाऊस कोसळत आहे त्यात दोन दिवसापासून जडीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हवेत गारवाही वाढला आहे त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे त्यामुळे प्रामुख्याने खामगाव शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या संख्येने ताप, खोकला, सर्दी व डायरीयाचे रुग्ण वाढले आहे अनेक रुग्ण प्रथम गावातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जात आहेत परंतु या उपचाराचा कोणताही फरक या रुग्णांवर पडत नसल्याने अनेक रुग्ण स्थानिक शासकीय रुग्णालयाची वाट धरू लागली आहे प्रत्येक घरामध्ये सर्दी व तापाचे रुग्ण दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने बालक व वृद्धांचा मोठा समावेश आहे. खामगाव येथील बाह्य रुग्ण विभागात दररोज ही रुग्ण वाढलेले दिसून येत आहेत कारण सर्दी तापाचे रुग्ण गेल्या पंधरा दिवसांपूर्वी पासून येत आहे दररोज 30ते 60 वर असणारा आगडा हा दीडशे ते दोनशे वर पोहोचला आहे काही रुग्णांना उपचारासाठी दाखल सुद्धा करून घेतल्या जात आहे यामध्ये डायरिया व अति तापाच्या रुग्णांचा समावेश आहे ग्रामीण भागातील मजूर वर्गाच्या पिण्यात नदी नाल्यातील पाणी येत असल्यामुळे त्यांना डायरियाची लागण होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Previous articleआमची बांधीलकी जनतेशी सत्तेशी नाही गुरूपोर्णीमानिमित्य मा.बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी दिली माताभगिनींना वस्त्रभेट
Next articleकुंटूर परीसरात पावसाचे थैमान, शेतीत पाणी साचल्याने आले तळ्याचे स्वरूप.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here