आशाताई बच्छाव
कुंटूर परीसरात पावसाचे थैमान, शेतीत पाणी साचल्याने आले तळ्याचे स्वरूप.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
कुंटूर –
——————————-
नायगाव तालुक्यातील कुंटूर परीसरात गेली पाच दिवसापासून पावसाने तालुक्यात जोर धरला आसुन यात शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक कुंटूर गावाच्या पूलावरून पाणी जात आसल्याने तालुक्याचा संपर्क तुटला आहे तर गावातील नाल्या तुडुंब भरलेल्या वाहत आहेत .
नायगांव तालुक्यात पावसाने गेली पाच दिवसापासून चांगलाच जोर धरला आसुन पावसाचे पाणी आनेक शेतक-याच्या पिके आसलेल्या शेतात साचले आसुन आनेक शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे . पाऊस हा सतत चालु आसल्याने नागरीक घरातच आहे तर जनावरे गोटयातील खुटयालाच आसल्याने त्याच्या वैरणासाठी मालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. , कुंटुर, देगाव, सांगवि, मेळगाव, धंनज, सातेगाव, इकळि, कोकलेगाव, मेळगाव, बळेगाव, रूई, शेळगाव, आनेक गावात या पावसाने थैमान घातले आहे .नदी, नाले, ओढे तुडंब भरून वाहत आहेत. या पावसाने शेतक-याचे मात्र मोठे नुकसान होत आहे .
पाच दिवसापासून सतत चालु असलेल्या पावसामुळे कामगाराच्या हाताला कामच नसल्याने त्याना मात्र आडचणीचा सामना करावा लागत आहे .शेतातील कामे बंद बांधकाम बंद , सर्व व्यवसाय ठप्प झाल्याने कुंटूर ची बाजारपेठ ही ठप्प झाली आहे. पाच दिवसापासून कुंटूर च्या बाजारात शुकशुकाट पाहवयास मिळत आहे . कुंटूर चा संपर्क तुटला कुंटूर तांडा , कोकलेगाव , ईकळीमाळ, नायगाव कडे मार्गावरील पूलावरून पाणी जात आसल्याने वाहतूक ठप्प झाली आहे . आनेक गावातील मुख्य रस्त्यावरील पूलावरून पाणी जात आसल्याने आनेक गावचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे .
हजारो एकर जमिनीवर पाण्याखाली गेल्याने शेतक-या पुढे मोठे संकट उभे राहीले आहे . कुंटूर येथील तीन पुलावरून पाणी जात आसल्याने नागरिकांना रस्ता बंद झाला आहे . आनेक घरात पावसाचे पाणी जाऊन मोठे नुकसान झाले आहे . तालुक्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे .






