• Home
  • १० जूनपासून नवीन नियम लागू, एसबीआय ग्राहकांना लाभ मिळणार

१० जूनपासून नवीन नियम लागू, एसबीआय ग्राहकांना लाभ मिळणार

🛑 १० जूनपासून नवीन नियम लागू, एसबीआय ग्राहकांना लाभ मिळणार 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 10 जून : ⭕ जर आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआयचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एसबीआयचा एक नवीन नियम १० जूनपासून लागू होणार आहे. लाखो ग्राहक याचा लाभ घेऊ शकतात. एसबीआयने १० जूनपासून फंडाचा मार्जिनल कॉस्ट बेस्ड इंटरेस्ट रेट (एमसीएलआर) मध्ये ०.२५ टक्के कपात करण्याची घोषणा केली आहे. या वजावटीनंतर एक वर्षाच्या कालावधीचा एमसीएलआर दर ७.२५ टक्क्यांवरून ७ टक्के करण्यात आला आहे.

एमसीएलआर दर सलग १३ वेळा बँकेने कमी केला आहे. यापूर्वी एसबीआयने बाह्य बेंचमार्क व्याज दर (ईबीआर) ७.०५ टक्क्यांवरून वार्षिक ६.६५ टक्क्यांवर आणला. त्याचबरोबर रेपो दराशी संबंधित व्याज दर ६.६५ टक्क्यांवरून ६.३५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. तथापि, हे नवीन दर जुलैमध्ये लागू होतील.

ग्राहकांचा फायदा काय?

बँकेच्या निवेदनात म्हटलं आहे की, “एमसीएलआर दराशी संबंधित गृह कर्जाची समान मासिक हप्त्याची रक्कम ४२१ रुपयांनी कमी केली जाईल. त्याचबरोबर ईबीआर, आरएलएलआर लिंक्ड होम लोनचा मासिक हप्ता ६६० रुपयांनी कमी केला जाईल. ही गणना ३० वर्षांच्या कालावधीसाठी २५ लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जावर केली गेली आहे.”⭕

anews Banner

Leave A Comment