Home सांस्कृतिक गणोशोत्सवाबाबत सरकारचा निर्णय मान्य असेल, मुबंईतील गणोशोत्सव मंडळांची भूमिका

गणोशोत्सवाबाबत सरकारचा निर्णय मान्य असेल, मुबंईतील गणोशोत्सव मंडळांची भूमिका

271

🛑 गणोशोत्सवाबाबत सरकारचा निर्णय मान्य असेल, मुबंईतील गणोशोत्सव मंडळांची भूमिका 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 10 जून : ⭕ मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईतील पाच प्रमुख गणेश मंडळांची आज बैठक बोलावली होती. या बैठकीत गणेशोत्सव साजरा करणार आणि कशा प्रकारे तो करता येईल यासंदर्भात त्यांच्याकडून सूचना जाणून घेतल्या. या बैठकीमध्ये मुंबईचा राजा गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,नरे पार्क, लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ, तेजुकाया गणेशोत्सव मंडळ, चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सरकार जो निर्णय घेईल तो मान्य असेल असंही गणेशोत्सव मंडळांनी म्हटलं आहे.

मुंबईमध्ये गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी बाहेर निघतात. या मंडळांनी सामंजस्याची भूमिका घेत शासनावर निर्णय सोपवला आहे. राज्य शासन जो निर्णय घेईल आणि जी नियमावली तयार करेल ती आम्हाला मान्य असेल. कारण लोकांचे प्राण जास्त महत्वाचे आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जर गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला, तरी आम्ही त्याचे स्वागत करू, अशी भूमिका गणेशगल्ली गणेशोत्सव मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी मांडली.

मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवात गणेश मंडळांकडून कशाप्रकारे खबरदारी घेण्यात येईत आणि काय नियोजन असेल या संदर्भातल्या सूचना मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जाणून घेण्यासाठी पाच प्रमुख गणेश मंडळाची बैठक बोलावली होती. बैठकीला उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी लालबाग परळ या भागातील मंडळाचे होते.⭕

Previous articleसटाणा तालुक्यात जोरदार प्रर्जन्यवृष्टी शेतकऱ्याचे अतोनात नुकसान
Next article१० जूनपासून नवीन नियम लागू, एसबीआय ग्राहकांना लाभ मिळणार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.