Home नांदेड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) देगलूर महिला तालुकाध्यक्ष पदी पूजाताई ईश्वरराव...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) देगलूर महिला तालुकाध्यक्ष पदी पूजाताई ईश्वरराव देशमुख ढोसणीकर यांची निवड.

39
0

आशाताई बच्छाव

1000307157.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) देगलूर महिला तालुकाध्यक्ष पदी पूजाताई ईश्वरराव देशमुख ढोसणीकर यांची निवड.
मराठवाडा विभागीय संपादक
मनोज बिरादार

नांदेड (देगलूर): राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देगलूर महिला तालुकाध्यक्ष पदी येथील धडाडीचे कार्यकर्ते ईश्वर देशमुख यांची पत्नी पूजाताई ईश्वरराव देशमुख ढोसणीकर यांची निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांच्या हस्ते पूजाताई ईश्वरराव देशमुख ढोसणीकर यांना नुकतेच देण्यात आले.
पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करणार
असल्याचे नूतन देगलूर महिला तालुकाध्यक्ष पूजाताई ईश्वरराव देशमुख ढोसणीकर यांनी सांगीतले.

पक्ष श्रेष्टी सोबत मिळून मिसळून सदैव काम करत राहीन असे पूजाताई ईश्वरराव देशमुख ढोसणीकर यांनी सांगितले
तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर पूजाताई ईश्वरराव देशमुख ढोसणीकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, अजित दादा पवार हे राज्यात मोठ्या हिंमतीने जनकल्याणाचे काम करीत आहेत. देगलूर तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याचे मी सतत प्रयत्न करीन असे त्यांनी सांगितले . त्यांच्या या निवडी बद्दल देगलूर शहर व तालुक्यातील सर्व क्षेत्रातून शुभेच्छा दिल्या जात आहे त्यांच्या या निवडी वेळी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा अध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी .नांदेड जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब पाटील. देगलूर तालुका अध्यक्ष राहुल देसाई देगावकर.,युवक नांदेड जिल्हा अध्यक्ष संभाजी मुकनर, देगलूर शहर अध्यक्ष देवेंद्र मोतेवार ,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष युवक संतोष थडके , विधानसभा अध्यक्ष युवक मिलिंद कावळगांवकर , संघटक चैतन्य घरडे, ईश्वर देशमुख,शिवाजी कावटवार आदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here