Home भंडारा परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागावर्गीय विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती वाटप -ॲड.डॉ.सत्यपाल कातकर...

परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागावर्गीय विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती वाटप -ॲड.डॉ.सत्यपाल कातकर ह्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश…..

49
0

आशाताई बच्छाव

1000307172.jpg

परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागावर्गीय विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती वाटप -ॲड.डॉ.सत्यपाल कातकर ह्यांनी केलेल्या प्रयत्नाला यश…..
`

संजीव भांबोरे
भंडारा,( जिल्हा प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी इतर मागासवर्ग,विमुक्त जाती ,जमाती, विशेष मागास प्रवर्ग संवर्गातील परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती गेल्या चार वर्षापासून प्रलंबित आहे.सदर शिष्यवृत्ती वाटप व्हावी म्हणून माजी प्राचार्य,मनोवैज्ञानिक ॲड.डॉ.सत्यपाल कातकर यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने दोन परिपत्रके सुद्धा काढले परंतु सदर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नव्हती याची जाणीव होताच ॲड.डॉ.सत्यपाल कातकर यांनी पुणे येथे प्रत्यक्ष दि.२२ नोव्हेंबर २०२३ ला श्री वासुदेव पाटील,उपसंचालक, इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून ही बाब निदर्शनास आणून दिली, त्यासोबतच कु.आचल विश्वास विहिरे,गडचांदूर,चंद्रपूर ही भोपाल येथे बीएएमएस वैद्यकीय शिक्षण घेत आहे, तिची व इतर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तीन सत्रापासून प्रलंबित आहे ही समस्या श्री प्रमोद जाधव, सहाय्यक आयुक्त(शिक्षण) यांच्याशी सुद्धा प्रत्यक्ष चर्चा करून बाहेर राज्यात शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची समस्या नजरेस आणून दिल्या व इतर मागासवर्गीय प्रलंबित शिष्यवृत्ती समस्येवर चर्चा करून श्री वासुदेव पाटील उपसंचालक यांनी सदर समस्या तात्काळ निकालीत निकालात काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली होती.ॲड.डॉ.सत्यपाल कातकर इथवरच थांबले नाहीत तर ते मुंबईला दि.२९ नोव्हेंबर २०२३ ला इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्रालय व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालयात जाऊन उपसचिवांशी प्रत्यक्ष वार्तालाप करून सदर शिष्यवृत्ती संदर्भात वाचा फोडली व उपसचिव ह्यांनी तर कुठल्याही परिस्थितीत फेब्रुवारी अखेरपर्यंत समस्त महाराष्ट्रात प्रलंबित असलेली इतर मागासवर्गीय ओबीसी,एनटी, विजे,एसबीसी व एस्सीची शिष्यवृत्ती वाटप करण्यात येईल व ही समस्या निकाली काढण्याचे आदेश दिले होते.ॲड.डॉ.सत्यपाल कातकर यांनी कायम विनाअनुदानित व्यवसाय कोर्सेसना पूर्ण देय शुल्कासह शिष्यवृत्ती मिळावी यासाठी डी.एड. कॉलेजला अधिव्याख्याता असतांना २००२ पासून काही डीएड प्रशिक्षणार्थी सोबत घेऊन आंदोलन सुरू केले व ह्याचा सतत पाठपुरावा केलेला आहे व त्याचेच फलित म्हणजे कायमविनाअनुदानित कोर्सेसना अर्थात बी.टेक,एमबीबीएस,बीएएमएस,बीएचएमएस ,फीजिओथेरपी आदी मेडिकल कोर्सेस,कृषी फार्मसी,नर्सिंग व्यवस्थापन,बीएड,डीएड आदी सर्वच कोर्सेसला पूर्ण देय शुल्कासहित शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनास घेण्यास भाग पाडले.त्यांच्या शिष्यवृत्ती आंदोलनामुळेच महाराष्ट्र शासन २००३ व २००७ पासून अनुसूचित जाती,विमुक्त भटक्या जाती/जमाती,विशेष मागास प्रवर्ग करिता १००% फिससह शिष्यवृत्ती तर ओबीसी ५०% देयशुल्कसहित शिष्यवृत्ती दिल्या जात आहे. ह्यासाठी ते स्वतः मंत्रालयात जाऊन मंत्री,प्रधान सचिव,उपसचिव, कक्ष अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष भेटून निवेदने देऊन व चर्चा करून समस्या मार्गी लावीत आले आहेत.ॲड.डॉ.सत्यपाल यांच्या निवेदनाची नोंद घेऊन ऑफलाईन पध्दतीने परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने अदा करण्याचे आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि.०६ फेब्रुवारी २०१९ ला निर्गमित केल्यामुळे अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप होत आहे परंतु
दि.०९ मार्च २०१७ मध्ये इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग वेगळा झाल्यामुळे बाहेर राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती समस्या प्रलंबित होत्या व त्या मार्गी लावण्याकरिता ॲड.डॉ. सत्यपाल कातकर यांनी सतत पाठपुरावा केला तेव्हा कुठे महाराष्ट्र शासनाने त्यांचे दि.२५ आगस्ट २०१९ चे निवेदनाची नोंद घेऊन दि.२५ मार्च २०२२ला शासन परिपत्रकाद्वारे निर्णय घेऊन बाहेर राज्यात शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ऑफलाइन पद्धतीने अदा करण्याचे मान्य केले परंतु मध्यंतरी सरकार बदल झाल्यामुळे पुन्हा नव्या सरकारने दि.१२ सप्टेंबर २०२२ ला पुन्हा नव्याने आफलाईन पध्दतीने अदा करण्याचे परिपत्रकाद्वारे निर्णय घेण्यास भाग पाडले परंतु त्याचाही अंमल आजपर्यंत झाला नव्हता व चंदपूर जिल्ह्यातीलच नव्हे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही सदर पोस्ट मॅट्रीक शिष्यवृत्ती वाटप न झाल्याचे लक्षात येताचब ॲड.डॉ.सत्यपाल कातकर ही समस्या सोडवण्याकरिता प्रत्यक्ष दि.२२ नोव्हेंबर २०२३ ला समाज कल्याण आयुक्तालय पुणे येथे व मुंबईला मंत्रालयात जाऊन उपसचिवासोबत प्रत्यक्ष चर्चा करून समस्येवर वाचा फोडल्यामुळे कार्यवाही सुरू झाली होती व त्यांच्या सतत पाठपुराव्यामुळेच नुकतेच इतर मागास बहूजन कल्याण विभाग उपसचिव श्री कैलास साळुंके ह्यांनी शिष्यवृत्ती ऑफलाइन -२०२४/प्र.क्र.२५ दि.२७ मार्च २०२४ आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत आदेश निर्गमित केली व त्याचबरोबर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ह्यांचे द्वारा श्री प्रशांत वाघ, अवर सचिव ह्यांनी भासशि.२०२४ /प्र.क्र.५०/ शिक्षणविभाग १ , दि.२७ मार्च २०२३ नुसार अन्वेषण प्रमाणपत्र जारी केले त्यामुळे संपूर्ण प्रलंबीत इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती रक्कम चार सत्राची शिष्यवृत्ती व अनुसूचित जाती विद्यार्थ्यांची २०२०-२१ पासून प्रलंबीत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यावर दिल्या जात आहे, परराज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती ऑफलाइन पध्दतीने अदा करण्याचे धोरण नसल्याने ती प्रलंबित होती त्याचा सतत व प्रत्यक्ष पाठपुरावा कुठलाही गाजा वाजा न करता ॲड.डॉ.सत्यपाल कातकर ह्यांच्या सतत पाठपुराव्याची शासनाने नोंद घेऊन महाराष्ट्र शासनाने आफलाईन पद्धतीने शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला व त्यामुळेच त्यांचा राजुरात नागरी सत्कार सुद्धा अनेक सामाजिक संघटनांनी व माजी,आजी आमदारानी केलेला आहे व ह्याची जाणीव ठेवून सदर सोडवण्यासाठी प्रयत्न करीत होते व शेवटी यशस्वी झालेत व परराज्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागासवर्ग ,विशेष मागास प्रवर्ग,विमुक्तभटक्या जाती ,जमाती व अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना पूर्ण देय शुल्कासह ऑफलाईन पध्दतीने शिष्यवृत्ती वाटप चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील विद्यार्थ्यांना करोडो रुपये शिष्यवृत्ती वाटप होत आहे,त्यामुळे त्यांनी ही समस्या सोडवण्यासाठी ज्या आमदार,मंत्री,सचिव,
उपसचिव,अवर सचिव,सहाय्यक आयुक्त व कक्ष अधिकारी व कर्मचारी ,सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहूजन कल्याण विभाग व वृत्तपत्र प्रतिनिधी ज्यांनी वेळोवेळी सदर समस्यावृत्त प्रकाशित करून सहयोग केला त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत व मनोवैज्ञानिक ॲड.डॉ.सत्यपाल कातकर ह्यांचे सर्वच स्तरावर अभिनंदन केल्या जात आहे.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) देगलूर महिला तालुकाध्यक्ष पदी पूजाताई ईश्वरराव देशमुख ढोसणीकर यांची निवड.
Next articleगावागावात मतदान जनजागृती अभियान !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here